---Advertisement---

‘उद्या परीक्षा आहे, एकतर गोल्डन डक हो किंवा शतक मार, नाहीतर…’, विराटने केली चाहतीची मागणी पूर्ण

On: रविवार, मे 8, 2022 6:44 PM
Virat-Kohli
---Advertisement---

आयपीएलच्या १५व्या हंगामातील ५४ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. आजपर्यंत एकही आयपीएल ट्रॉफी न जिंकलेला संघ आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. रविवारी (८ मे) हैदराबादविरुद्ध खेळताना देखील विराट शून्य धावांवर बाद झाला, पण त्याने त्याच्या एका चाहतीचे मन मात्र नक्कीच राखले.

मागच्या दोन सामन्यांमध्ये आरसीबीसाठी विराट कोहली (Virat Kohli) संयमी खेळ खेळला आणि त्यापैकी एका सामन्यात अर्धशतक देखील केले. परंतु रविवारच्या सामन्यात मात्र त्याला स्वतःचे खातेही खोलता आले नाही. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस ही सलामीवीर जोडी आरसीबीच्या डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आले, पण पहिल्याच चेंडूवर विराटच्या रूपात आरसीबीला झटका बसला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

विराट या सामन्यात एक जरी धाव करू शकला नसला, तरी त्याच्या एका चाहतीचे त्याने मन राखले आहे. तनया नावाच्या या चाहतीने विराटला त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावर मेसेज केला होता. मेसेजमध्ये तिने लिहिले आहे की, “उद्या माझी परीक्षा आहे. एकतर शून्यावर बाद हो किंवा १०० धावा कर. कृपया याव्यतिरिक्त इतर काहीच करू नको, नाहीतर माझा मूड खराब होईल आणि मी उद्याच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करू शकणार नाही.”

https://twitter.com/traumatied/status/1523185232056582144?s=21&t=KjupT4tq3o3Ob7v2aZtaDw

विराटने या चाहतीने केलेला मेसेज जरी पाहिला नसला, तरी त्या चाहतीच्या मनाप्रामाणेच त्याने प्रदर्शन केले. राजस्थानचा गोलंदाज जगदीशा सुचिथने आरसीबीच्या डावातील पहिले षटक टाकले. षटकातील पहिल्या चेंडूवर त्याने स्ट्राईकवर असेलल्या विराटला कर्णधार केन विलियम्सनच्या हातून झेलबाद केले. विराटची विकेट घेतल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रजत पाटीदार फलंदाजीसाठी आला. पाटीदारने ४८ धावा केल्या आणि तो देखील सुचितच्याच चेंडूवर झेलबाद झाला. यादरम्यान कर्णधार डू प्लेसिसने मात्र नाबाद ७३ धावांची मोठी खेळी केली.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

दिल्लीला धक्क्यावर धक्के! सीएसकेविरुद्धच्या ‘करा अथवा मरा’ सामन्यापूर्वी पृथ्वी शॉ रुग्णालयात दाखल

ज्याने टीम इंडियात घेतली होती जागा, आता त्यालाच बाहेर करत चहल गाजवणार टी२० विश्वचषक?

कोलकाताचं चुकलं कुठं? लखनऊविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं कारण 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---