---Advertisement---

मुंबई इंडियन्ससाठी काय पण! टीम संघर्ष करत असताना सूर्यकुमारची लक्षवेधी प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाला

On: शनिवार, एप्रिल 16, 2022 4:56 PM
Suryakumar-Yadav
---Advertisement---

मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या पंधराव्या हंगामात संघर्ष करताना दिसत आहे. त्यांना अद्याप आपल्या विजयाचे खाते उघडता आलेले नाही. मुंबई संघाने त्यांचे हंगामातील सुरुवातीचे पाचही सामने गमावले आहेत. दरम्यान मुंबईकडून दमदार फलंदाजी प्रदर्शन करत असलेल्या सूर्यकुमार यादव हा संघासाठी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीला तयार आहे. सहसा वरच्या फळीत फलंदाजी करणारा सूर्यकुमार या हंगामात मुंबईकडून चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसत आहे.

मुंबई संघातील (Mumbai Indians) आपल्या बदलत्या फलंदाजी क्रमाबद्दल बोलताना सूर्यकुमार (Suryakumar Yadav) म्हणाला की, “खेळपट्टीवर फलंदाजाला कधी पाठवायचे हे संघ व्यवस्थापन ठरवत असते. मी ३, ४, ५ किंवा ६ पैकी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी तयार (Bat In Any Condition) आहे. मी दीर्घ काळापासून क्रिकेट खेशत आहे. त्यामुळे माझ्यासाठी मी कोणत्या स्थितीत फलंदाजी करतो आणि कोणत्या स्थितीत नाही हे महत्त्वाचे आहे.”

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

भलेही मुंबई संघाचे या हंगामातील प्रदर्शन सुमार राहिले असले तरीही, सूर्यकुमार, डेवाल्ड ब्रेविस आणि तिलक वर्मा अशा खेळाडूंच्या प्रदर्शनाने सर्वांना प्रभावित केले आहे. त्यांनी प्रत्येक सामन्यामध्ये चांगला खेळ दाखवला आहे आणि संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

सूर्यकुमार पुढे बोलताना म्हणाला, “आयपीएलच्या मेगा लिलावानंतर बरेच नवे खेळाडू संघात आले आहेत. हे सर्व खेळाडू मैदानावर आपले योगदान देतील. तो म्हणाला की, तुम्ही पाहू शकता, डेवाल्ड आणि तिलकचे आतापर्यंत प्रदर्शन कसे राहिले आहे. आम्ही पुढील काही वर्षांसाठी या संघासोबत आहोत. मुंबई संघ सर्वश्रेष्ट संघांपैकी एक आहे.”

हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर सूर्यकुमार मुंबई संघासोबत जोडला गेला आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मी सराव करत असताना सामन्यातील स्थितींचे आकलन करण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे मला मैदानावर उतरल्यानंतर जास्त समस्या येत नाहीत.”

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘गब्बर’ने लावले कॅप्टन मयंक अन् रबाडासह झक्कास ठुमके; भारताच्या विश्वविजेत्या खेळाडूची आली कमेंट

उमरान मलिकच्या जबरदस्त यॉर्करवर श्रेयर क्लिन बोल्ड, गोलंदाजी प्रशिक्षक स्टेनच्या आनंदाला नव्हत्या सीमा

तेलही गेलं अन् तूपही! दीपक चाहरला गमवावे लागणार लिलावातील १४ कोटी, रिकामं हात परतावं लागणार घरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---