Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विराटने घेतली शपथ; म्हणाला, ‘आरसीबीसोबत पुढील ३ वर्षे घालवायची आहेत, अजून माझं बेस्ट देणं बाकी आहे’

December 1, 2021
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Virat-Kohli

Photo Courtesy: Twitter/IPL


नुकतीच मंगळवार रोजी (३० नोव्हेंबर) इंडियन प्रीमियर लीग २०२२ ची (आयपीएल) खेळाडूंची रिटेंशन प्रक्रिया (खेळाडूंना संघात कायम करणे) पार पडली आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने (आरसीबी) त्यांचा माजी कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यांना संघात कायम ठेवले आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आरसीबीचा भाग असलेल्या कोहलीसाठी फ्रँचायझीने १५ कोटी रुपये मोजले आहेत. फ्रँचायझीने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे रनमशीन विराट कोहली भावुक झाला आहे. त्याने आरसीबीने आपल्याला रिटेन केल्यानंतर लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे.

आयपीएलचा आगामी पंधरावा हंगामच नव्हे तर पुढील तिनही हंगामात आपण आरसीबीसोबत खेळण्यास तयार असल्याचे वक्तव्य त्याने केले आहे. आरसीबीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर विराट बोलत होता.

आरसीबीच्या यूट्यूब चॅनलवरील एका व्हिडिओमध्ये बोलताना विराट म्हणाला की, “प्रवास सुरू आहे. मला आरसीबीने रिटेन केले आहे. जेव्हा त्यांनी माझ्याशी संपर्क साधला, तेव्हा माझ्या डोक्यात दुसरा कोणताही विचार आला नाही. गेल्या काही वर्षांपासून आरसीबीसोबतचा हा प्रवास अद्भुत असा राहिला आहे. या फ्रँचायझीसोबतची अजून पुढील ३ वर्षे माझ्यासाठी खूप महत्त्वाची असतील. मला वाटते की, अजून माझे सर्वोत्कृष्ट येणे बाकी आहे आणि मला या गोष्टीची पूर्णपणे जाणीव आहे, येत्या हंगामात काय होणार आहे.”

हृदय आणि आत्म्याने आरसीबीसोबत आहे
“आमच्या प्रशंसकाचा आम्हाला मिळणारा पाठिंबा ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याचबरोबरच माझे आणि माझ्या संघ सहकाऱ्यांचे आमच्या संघ व्यवस्थापनसोबतचे नातेही खूप चांगले राहिले आहे. येत्या हंगामात सर्वांना मैदानावर माझे नवे रूप पाहायला मिळेल. मी माझ्या हृदय आणि आत्म्याने सदैव आरसीबीसोबत असेन,” असेही तो पुढे बोलताना म्हणाला.

“The amazing journey at RCB continues. 3 more years with this franchise that means so much to me. I believe the best is yet to come.” – @imVkohli

We and the RCB fans love you too, King Kohli. ❤️#PlayBold #WeAreChallengers #IPLRetention pic.twitter.com/63rkMcPcCO

— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) December 1, 2021

आरसीबीसाठी विराटने पगारात केली कपात
महत्त्वाची बाब म्हणजे, विराटने आरसीबीचा भाग बनण्यासाठी मोठे बलिदान दिले आहे. आरसीबीने यंदा त्याला १५ कोटींच्या रक्कमेसह संघात कायम केले आहे. त्याची ही रक्कम गेल्या ३ वर्षांतील कमाईपेक्षा २ कोटी रुपयांनी कमी आहे. या पैशांद्वारे मेगा लिलावात आरसीबी फ्रँचायझीला प्रतिभावा खेळाडूंना विकत घेण्यासाठी साहाय्य व्हावे, म्हणून त्याने हा निर्णय घेतला आहे. आरसीबी फ्रँचायझीकडे मेगा लिलावासाठी आता ५७ कोटी रुपये शिल्लक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई कसोटीपूर्वी एमसीएने महाराष्ट्र सरकारला दिला ‘हा’ शब्द

जेव्हा सचिनबरोबर ११ खेळाडूंनी एकाच दिवशी एकाच सामन्यात केले होते आंतरराष्ट्रीय पदार्पण

शुभमंगल सावधान! विराटचा ‘जिगरी दोस्त’ करतोय सोनाक्षी सिन्हाशी लग्न?


Next Post
rashid-khan

केवळ पैशासाठी नाते तोडून गेला राशिद? काय घडले सनरायझर्सच्या गोटात? वाचा सविस्तर

Photo Courtesy:iplt20.com

इतकं कोण करतं ना? विराटचं कौतुक करावं तितकं कमीच, आरसीबीसाठी स्वत:च्या पगारात केली कपात

Photo Courtesy: Twitter/@ICC

कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे दोन गोलंदाज, नावं ऐकून व्हाल थक्क

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143