इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये बुधवारी (दि. ११ मे) दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला धूळ चारली. राजस्थान रॉयल्सने ८ विकेट्सने सामन्यात पराभव स्वीकारला. दिल्लीला मिळालेल्या विजयात वरच्या फळीतील मिचेस मार्श आणि डेविड वॉर्नर यांनी महत्वाचे योगदान दिले. वॉर्नरने सामन्यात ठोकलेल्या अर्धशतकाच्या जोरावर त्याने एका खास विक्रमात विराट कोहली, एबी डिविलियर्स आणि ग्रिस गेल सारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) या सामन्यात ४१ चेंडूत ५२ धावा करून शेवटपर्यंत नाबाद राहिला, तर तिसऱ्या क्रमांकावर आलेला मिशेल मार्शने अवघ्या ६२ चेंडूत ८९ धावा ठोकल्या. अवघ्या ११ धावा कमी पडल्यामुळे मार्शचे आयपीएलमधील शतक हुकले. दरम्यान, डेविड वॉर्नरचा हा आयपीएलमधील १६०वा डाव होता. आयपीएलमध्ये पहिल्या १६० डावांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत वॉर्नर आता पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या यादीत विराट कोहली (Virat Kohli) यापूर्वी पहिल्या क्रमांकावर होता, पण वॉर्नरने त्याला मागे टाकले आहे. वॉर्नरने त्याच्या पहिल्या १६० आयपीएल डावांमध्ये ४२.५८च्या सरासरीने आणि १४०.८१च्या स्ट्राईक रेटने ५८७६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या चार शतकांचा, तर ५५ अर्धशतकांचा समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावरील विराट कोहली वॉर्नरपेक्षा ७५६ धावांनी मागे आहे. विराटने पहिल्या १६० आयपीएल डावांमध्ये ५११० धावा केल्या होत्या. एबी डिविलियर्सने त्याच्या पहिल्या १६० डावांमध्ये ४९७८ धावा केल्या होत्या आणि तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ४९६५ धावांसह ख्रिस गेल या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या क्रमांकावर ४६१४ धावांसह शिखर धवन आहे.
दरम्यान, उभय संघातील हा सामना बुधवारी (दि. ११ मे) मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर खेळला गेला. दिल्ली नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने ६ विकेट्सच्या नुकसानावर १६० धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीच्या फलंदाजांनी तुफानी प्रदर्शन केले. दिल्ली कॅपिटल्सने ११ चेंडू आणि ८ विकेट्स शिल्लक ठेऊन हे लक्ष्य गाठले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात दिनेश कार्तिकला मिळणार जागा? गावसकर म्हणाले, ‘तुम्ही त्याच्या वयाचा विचार करूच नका’
कबड्डी खेळाबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! अजित पवारांकडून ‘इतक्या’ कोटींचं अनुदान मंजूर
आयपीएलमध्ये ‘फ्लॉवर’ समजून बेस प्राईजमध्ये घेतले गेलेले ५ खेळाडू, पण करून दाखवली ‘फायर’ कामगिरी