---Advertisement---

शतकांचा रतीब घालणाऱ्या ‘बॉस’ला बाद करण्यासाठी मावीचा भन्नाट कॅच; हवेत उडी घेत उंचावल्या सर्वांच्याच भुवया

Jos-Buttler-And-Shivam-Mavi
---Advertisement---

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर आयपीएल २०२२मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे. परंतु सोमवारी (दि. ०२) तो मोठी खेळी करू शकला नाही. केकेआरच्या शिवम मावीने सीमारेषेजवळ उत्कृष्ट झेल पकडून बटलरला तंबूत माघारी धाडले. बटलर स्वस्तात बाद झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही आणि परिणामी संघ पराभूत झाला. मावीने बटरलचा घेतलेला झेल, चर्चेचा विषय ठरला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने ५ विकेट्सच्या नुकसानावर १५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरने हे लक्ष्य तीन विकेट्सच्या नुकसानावर आणि ५ चेंडू शल्लक असताना गाठले. जोस बटलर (Jos Buttler) २५ चेंडू खेळला आणि अवघ्या २२ धावा केल्या. मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात असेलल्या बटलरने शिवम मावी (Shivam Mavi) याच्या हातात झेल दिला आणि विकेट गमावली. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

https://twitter.com/Rahilsa61575873/status/1521160292335464448?s=20&t=gEBHj6OLK9MAP15ghOFD4g

राजस्थान रॉयल्सच्या डावातील ९व्या षटकात बटलरने विकेट गमावली. दिग्गज वेगवान गोलंदाज टीम साऊदी हे षटक घेऊन आला होता. बटलर त्यावेळी १०० पेक्षा कमीच्या स्ट्राईक रेटसह खेळत होता आणि जलद धावा करण्याच्या विचार देखील होता. साऊदीच्या षटकातील तिसरा चेंडू त्याने सीमारेषेपार षटकारासाठी खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू सीमारेषेपार न जाता शिवम मावीच्या हातात गेला.

बटलरने मारलेल्या या शॉटमध्ये ताकत तर होती, पण अपेक्षित उंची मात्र मिळू शकली नाही. अशात मावीला देखील हा झेल संघासाठी किती महत्वाचा आहे, हे चांगलेच माहित होते. त्याने स्वतःचे क्षेत्ररक्षणाचे पूर्ण कौशल्य पणाला लावले आणि सीमारेषेजवळ उत्कृष्ट झेल झेलला. शिवम मावीने दाखवलेल्या चपळाईसाठी त्याचे सर्वांनी कौतुक केले.

दरम्यान बटलरने विकेट गमावल्यानंतर कर्णधार संजू सॅमसन (५४) एकमेव खेळाडू ठरला, ज्याने राजस्थानसाठी अर्धशतक केले. प्रत्युत्तरात केकेआरचे सलामीवीर बाबा इंद्रजित (१५) आणि ऍरॉन फिंच (४) स्वस्तात बाद झाले, पण अखेरच्या षटकांमध्ये नितीश राणा (४८) आणि रिंकू सिंग (४२) यांनी संघाला विजय मिळवून दिला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

पुण्यातील धोनीची लोकप्रियता पाहून भारावला निकोलस पूरन; म्हणाला, ‘मी कधीच विसरणार नाही…’

स्वत:ला दिलेल्या वचनाला जागला रिंकू सिंग; सामन्यापूर्वी हातावर लिहिली होती प्रेरणा देणारी ‘ही’ गोष्ट

श्रेयस अय्यरच्या विकेटवरून झाली कॉमेडी, पंचांनी दिला भलताच निर्णय; मग पडले तोंडघशी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---