इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्सच्या डावाची सुरुवात करत आहे. चालू हंगामात जोस बटलर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने हंगामात आतापर्यंत तीन शतके आणि तीन अर्धशतके ठोकली आहेत. असे असले, तरी सोमवारी (२ मे) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध बटलर मोठी खेळी करू शकला नाही, पण यादरम्यान त्याने विराट कोहलीचा खास विक्रम मात्र मोडला.
भारताचा आणि आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. परंतु विराट जगातील या सर्वात मोठ्या टी२० लीगचा सर्वोत्तम फलंदाज राहिला आहे. आयपीएल २०१६ मध्ये विराट कोहलीने आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात जास्त म्हणजेच ९७३ धावा केल्या होत्या. या धावा विराटने १६ डावांमध्ये केल्या होत्या. जोस बटलर (Jos Buttler) आयपीएल २०२२ मध्ये विराटचा हा विक्रम मोडेल, अशी शक्यता आहे. बटलरने विराटचा हा विक्रम मोडण्यासाठी पहिले पऊल देखील टाकले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आयपीएल २०१६ मध्ये विराटने त्याच्या पहिल्या १० डावांमध्ये ५६७ धावा केल्या होत्या. त्या तुलनेत बटलरने आयपीएल २०२२च्या त्याच्या पहिल्या १० डावांमध्ये विराटपेक्षा चांगले प्रदर्शन केले आहे. बटलरने हंगामातील पहिल्या १० डावांमध्ये ५८८ धावा केल्या आहेत आणि एकप्रकारे विराटला मागेच टाकेल आहे. बटलर जर असेच प्रदर्शन करत राहिला, तर पुढच्या काही सामन्यांमध्ये विराटचा एका हंगामात सर्वाधिक आयपीएल धावांची विक्रम देखील मोडू शकतो.
दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सोमवारी मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात जोस बटलर अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. सलामीवीर बटलर २२, तर देवदत्त पडिक्कल अवघ्या २ धावांवर तंबूत परतले. परंतु तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या संजू सॅमसनने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. सॅमसन ५४ धावा केल्या आणि झेलबाद झाला.
आयपीएल हंगामात पहिल्या १० डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
५८८ धावा- जोस बटलर (आयपीएल २०२२)*
५६८ धावा- विराट कोहली (आयपीएल २०१६)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उमरानच्या सुपरफास्ट चेंडूवर ऋतुराजचा ‘लय भारी’ षटकार; गोलंदाजाची रिऍक्शन पाहण्यासारखी
सुपरमॅन बनत रिझवानचा हवेत एकहाती झेल, अद्भुत कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल