आयपीएल २०२२चा विसावा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात खेळवला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला हा सामना राजस्थानने ३ धावांनी जिंकला. हा त्यांचा हंगामातील तिसरा विजय होता. राजस्थानला हा सामना जिंकून देण्याच सर्वात मोठा वाटा राहिला, फिरकीपटू युझवेंद्र चहल याचा. चहलने या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी करत लखनऊच्या ४ फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याच्या या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर त्याने आपल्या प्रदर्शनावर प्रतिक्रिया दिली आहे.
सामनावीर बनल्यानंतर चहलने (Yuzvendra Chahal) सांगितले की, त्याचे डोकेच त्याचे सर्वात मोठी ताकद (Yuzvendra Chahal Strength) आहे. तो केव्हाही गोलंदाजीसाठी तयार असतो आणि आपल्या खराब प्रदर्शनाबाबत जास्त विचार करत नाही.
युझवेंद्र चहलने दिलेली प्रतिक्रिया
चहल (Yuzvendra Chahal Statement) म्हणाला की, “माझे डोकेच माझी सर्वात मोठी ताकद आहे. मी १ ते २० षटकांदरम्यान कधीही गोलंदाजी करण्यासाठी तयार असतो. मी सहसा मैदानावर जे करत असतो, त्यापासून भटकू इच्छित नाही. मी कधीही माझ्या खराब प्रदर्शनाबद्दल जास्त विचार करत बसत नाही.”
पुढे आपल्याला कोणाची विकेट घेण्यात सर्वात जास्त मजा आली, याबद्दल सांगताना चहल म्हणाला, “क्विंटन डी कॉकची विकेट घेऊन मला सर्वाधिक आनंद झाला. कारण तो कधीही सामन्याता नूर पालटू शकत होता. मी त्याला बाहेरून फटके खेळताना पाहिले, याचा फायदा घेत मी त्याची विकेट घेतली. तसेच मी आयुष बदोनीलाही थोडा लांब चेंडू फेकत माझ्या जाळ्यात फसवले होते.”
युझवेंद्र चहलची गोलंदाजी कामगिरी
चहलने राजस्थानच्या १६६ धावांच्या आव्हानाचा बचाव करताना ४ षटके गोलंदाजी करताना ४१ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. सर्वप्रथम त्याने लखनऊचा घातक फलंदाज क्विंटन डी कॉकला रियान परागच्या हातून झेलबाद केले होते. डी कॉक ३९ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर त्याने आयुष बदोनीला ५ धावांवर रियान परागच्या हातून झेलबाद केले. तसेच कृणाल पंड्याला त्रिफळाचीत आणि दुष्मंथा चमीराला पायचित करत त्याने ४ विकेट्स घेतल्या होत्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘…बडा पछताओगे’, कुलदीपने केकेआरला दिवसा चाँदणे दाखवत पूर्ण केला सूड, आल्या प्रतिक्रिया