---Advertisement---

चहलसोबतच्या ‘त्या’ भांडणावर सूर्यकुमारची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी तर काहीच म्हणलो नव्हतो, मला…’

Suryakumar-Yadav-And-Yuzvendra-Chahal
---Advertisement---

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्सला ओळखले जाते. परंतु चालू हंगामात मुंबईचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले आहे. सलग आठ पराभवांनंतर मुंबईला अखेर शनिवारी (३० एप्रिल) हंगामातील पहिला विजय मिळला. राजस्थान रॉयल्सला या सामन्यात ५ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. उभय संघातील या सामन्यात पर्पल कॅपचा मानकरी युजवेंद्र चहल पंचांच्या एका निर्णयानंतर नाराज दिसला.

घडले असे की, मुंबई इंडियन्सच्या डावातील आठव्या षटकात युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) गोलंदाजी करत होता. षटकातील एक चेंडू स्ट्राईकवर असलेल्या सूर्यकुमार यादवच्या पॅडवर जाऊन लागला. पंचांनी मात्र विकेसाठी केली गेलेली अपील नाकारली. यानंतर राजस्थान रॉयल्सने डीआरएस घेतला. अंतिम निर्णय घेण्यासाठी पंचांना बऱ्याच वेळा रिप्ले पाहावा लागला. परंतु शेवटी तिसऱ्या पंचांनी देखील सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) नाबाद असल्याचेच सांगितले. पंचांच्या या निर्णयानंतर चहल सूर्यकुमारवर देखील नाराज झाला असल्याचे दिसले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पंचांनी जरी हा निर्णय पूर्वी विचारपूर्वक घेतला असला, तरी युजवेंद्र चहल मात्र याच्याशी सहमत नव्हता. चहल बराच वेळ मोठ्या स्क्रीनवर लिहिलेल्या ‘नॉट आऊट’ या अक्षरांकडे पाहत होता. तेव्हा सूर्यकुमार नाराज असलेल्या चहलजवळ आला आणि त्याची गळाभेट घेतली. परंतु तरीही चहलच्या चेहऱ्यावरील भाव किंचितही बदलेले नाही. शनिवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात घडलेला हा प्रकार चर्चेचा विषय बनला. दरम्यान, सामना संपल्यानंतर सूर्यकुमारने याविषयी प्रतिक्रिया दिली.

सूर्यकुमार म्हणाला की, “सामन्यादरम्यान मी त्याला काहीच म्हणलो नव्हतो, हा फक्त छोटासा वाद होता, जो आम्ही एन्जॉय केला. मला खूप आनंद झाला की, मी पंचांच्या निर्णयामुळे वाचलो आणि गोष्टी नंतर आमच्यासाठी अनुकूल घडल्या. युजवेंद्र चहल उत्कृष्ट गोलंदाज आणि मला त्याच्यासोबत असा वाद घालने आवडले.”

दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील हा सामना मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर खेळला गेला. नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने ६ विकेट्सच्या नुकसानावर १५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात सूर्यकुमारने मुंबईसाठी सर्वाधिक ५१ धावांचे योगदान दिले आणि ५ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. राजस्थानसाठी त्यांचा सलामीवीर जोस बटलरने सर्वात जास्त म्हणजेच ६७ धावा केल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

रोहितची विकेट पडल्यावर ढसाढसा रडली पत्नी रितिका

‘त्याला कर्णधार बनवलेच कशासाठी…’, जडेजाने नेतृत्व सोडल्यानंतर भारताच्या दिग्गज कर्णधाराने साधला निशाणा

ताशी १५०हून अधिकच्या गतीने चेंडू फेकणाऱ्या उमरान मलिकवर गांगुलीही फिदा; वाचा काय म्हणाला ‘दादा?’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---