आयपीएल २०२२चा ५२वा सामना पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळला. शनिवारी (७ मे) खेळल्या गेलेल्या डबल हेडरच्या या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ६ विकेट्सने विजय मिळवला. पराभवानंतर पंजाबचा कर्णधार मयंक अगरवाल खूपच निराश दिसला आणि त्याने ही निराशा व्यक्त देखील केली.
पंजाबकडून मिळेलेले १९० धावांचे लक्ष्य राजस्थानने शेवटच्या षटकात गाठले आणि प्लेऑफमध्ये स्थान बनवण्यासाठी एक पाऊल अजून पुढे टाकले. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी कराताना पंजाबने मोठी धावसंख्या उभी केली, पण त्यांना विजय मिळू शकला नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सामना संपल्यानंतर पंजाबचा कर्णधार मयंक अगरवाल (Mayank Agarwal) म्हणाला की, “मला वाटते की, आम्ही खूप चांगली धावसंख्या उभी केली होती. मधल्या षटकांमध्ये आम्ही आमच्या गोलंदाजीच्या योजनेवर टिकून राहू शकलो नाही. ते आम्हाला लक्ष करून एकापाठोपाठ चौकार मारत होते. २० षटकांपर्यंत सामना त्यांच्या बाजूने झुकलेला होता.”
पंजाबने जरी या सामन्यात पराभव स्वीकारला असला, तरी त्यांचा सलामीवीर जॉनी बेयरस्टो आणि गोलंदाजीत अर्शदीप सिंगने चांगले प्रदर्शन केले. या प्रदर्शनासाठी मयंकने त्यांचे कौतुक देखील केले. तो म्हणाला की, “अर्शदीप एखाद्या अप्रतिम खेळाडूपेक्षा कमी नाहीये. जेव्हा संघाला गरज असते, तेव्हा तुम्हाला योगदान द्यायचे असते. तो संघाच्या एका उत्कृष्ट कर्णधारासारखा आहे आणि ही गोष्ट आमच्यासाठी चांगली आहे. जॉनीने देखील आज चांगली फलंदाजी केली.”
दरम्यान, सलामीवीर जॉनी बेयरस्टोच्या ५६ धावांच्या जोरावर पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्सच्या नुकसानावर १८९ धावा केल्या आणि राजस्थानला विजयासाठी १९० धावांचे लक्ष्य दिले. राजस्थानने हे लक्ष्य ४ विकेट्सच्या नुकसानावर आणि १९.४ षटकांमध्ये गाठले. राजस्थानसाठी सलामीवीर यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ६८ धावांचे योगदान दिले. तसेच, गोलंदाजांमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी अनुभवी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. दुसरीकडे पंजाब किंग्जसाठी अर्शदीप सिंगने २ खेळाडूंना तंबूत पाठवले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
होल्डरने अवघ्या १०१ धावांवर गुंडाळला कोलकाताचा डाव; ७५ धावांनी विजय मिळवत लखनऊला बनवले ‘टेबल टॉपर’
रबाडाला ‘बच्चा’ समजणे बटलरला पडले महागात, पहिल्या ५ चेंडूवर चोपल्यानंतर गोलंदाजाने ‘असा’ काढला काटा