हार्दिक पंड्या इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामात एक उत्कृष्ट कर्णधार म्हणून चर्चेत आला. आयपीएलमध्ये नव्याने सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सला त्याने पहिल्याच हंगामात विजेतेपद पटकावून दिले आहे. याच पार्श्वभूमीवर दिग्गज आणि चाहते त्याचे कौतुक करत आहेत. आता याच साखळीत भारतीय संघाचे माजी खेळाडू संजय मांजरेकर जोडले गेले आहेत. मांजरेकरांच्या मते हार्दिकच्या नेतृत्वात एमएस धोनीची झलक दिसते.
दिग्गज माजी खेळाडू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्याविषयी बोलताना म्हणाले की, “अंतिम सामन्यात हार्दिकने चांगली गोलंदाजी केली. फलंदाजीमध्येही त्याने महत्वाच्या चौथ्या क्रमांकावर खेळताना संपूर्ण हंगामात चांगली फलंदाजी केली. त्याच्या नेतृत्वात धोनीची झलक दिसते. तो प्रत्येक सामन्यात अगदी शांत दिसला आणि संघाच्या गरजेनुसार निर्णय घेतले. असे वाटत होते की, तो कर्णधारपदाचा आनंद घेत होता आणि खूप शांत दिसत होता. धोनीही असेच करायचा.” मांजरेकरांच्या मते पंड्या ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये बदल करत होता, धोनीही अगदी असेच बदल करायचा.
गुजरात टायटन्ससोबत आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर हार्दिकचे पुढचे लक्ष भारतासाठी विश्वचषक जिंकणे आहे. याविषयी बोलताना हार्दिक म्हटलेला की, “मला भारतीय संघासाठी कसल्याही परिस्थितीत विश्वचषक जिंकायचाच आहे. त्यासाठी मी माझ्याकडचे सर्वकाही झोकून द्यायला तयार आहे. माझी ओळख भारतीय संघ आहे. माझ्यासाठी भारतीय संघाकडून खेळणे हे एक स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. मी भारतासाठी किती सामने खेळलो आहे, त्याने काही फरक पडत नाही, पण मी माझ्या संघाचे प्रतिनिधित्व करेल, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असेल. जे प्रेम आणि समर्थन मला मिळाले आहे, ते भारतासाठी खेळावे यासाठी मिळाले आहे. त्यामुळेच मला कसल्याही परिस्थितीत भारतासाठी विश्वचषक जिंकायचा आहे.”
दरम्यान, आयपीएल २०२२ सुरू होण्यापूर्वी हार्दिकला गुजरात टायटन्सने रिटने केले आणि संघाचा कर्णधार देखील बनवले. हंगाम सुरू होण्यापूर्वी हार्दिकच्या प्रदर्शनाविषयी अनेकांना शंका होती. कारण, तो मोठ्या काळापासून खराब फॉर्ममध्ये होता. याच पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सने त्याला रिलीज केले होते, पण नवीन फ्रँचायझीसाठी खेळताना त्याने जबाबदारी चोख पार पाडली आणि विजेतेपद जिंकले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिजचा दिग्गज काळाच्या पडद्याआड, भारताविरुद्ध एका कसोटी डावात घेतल्या होत्या ५ विकेट्स
सचिनने निवडली आयपीएल २०२२ची बेस्ट इलेव्हन; धोनी, विराट, रोहितला वगळले, मग कर्णधारपदी कोण?
चुना लगा दिया! गांगुलीच्या बीसीसीआय अध्यक्षपद राजीनामाच्या प्रँकनंतर चाहत्यांकडून मीम्सची बरसात