सोमवारी (१८ एप्रिल) आयपीएल २०२२ च्या ३० व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाइट रायडर्सला धूळ चारली आहे. या पराभवानंतर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर निराश दिसला. सामन्यात एक वेळ केकेआरचे पारडे जड वाटत होते, पण शेवटच्या चार षटकात राजस्थानने केलेल्या अप्रतिम गोलंदाजीमुळे केकेआरला पराभव मिळाला. पराभवानंतर केकेआरचा मालक आणि बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानने खास ट्वीट करून संघाचे कौतुक केले.
राजस्थानविरुद्धचा हा सामना केकेआरसाठी खास होता. केकेआरचा वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) साठी आयपीएल कारकिर्दीतील हा १५० वा सामना होता. केकेआरचा सध्याचा प्रशिक्षक ब्रँडन मॅक्यूलम (Brendon McCullam) याने आयपीएलच्या पहिल्या हंगामातील पहिल्या सामन्यात केकेआरसाठी १५८ धावांची दमदार खेळी केली होती. मॅक्यूलमने केकेआरसाठी २००८ हंगामात केलेल्या या वादळी खेळीला देखील आज १५ वर्ष पूर्ण झाले होते. परंतु हा महत्वाचा सामना केकेआरला जिंकता आला नाही. शाहरुखने त्याच्या ट्वीटमध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे.
अधिकृत ट्वीटवर खात्यावरून केलेल्या पोस्टच्या माध्यमातून शाहरुख खानने संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम केले आहे. शाहरुख म्हणाला की, “चांगले खेळलात मुलांनो. श्रेयस अय्यर, एरॉन फिंच आणि उमेश यादवने संघासाठी शेवटपर्यंत संघर्ष केला आणि चांगले प्रयत्न केले. मला माहिती आहे की, आपण पराभूत झालो आहोत, पण जर आपल्याला पराभूत व्हायचेच आहे, तर याच पद्धतीने लढून पराभूत होऊ. हीच एकमात्र पद्धत आहे. तुमची डोके नेहमी वर ठेवा.”
Well played boys. Stupendous effort by @ShreyasIyer15 @AaronFinch5 @y_umesh congrats to #SunilNarine for the 150th match & @Bazmccullum for that innings 15 yrs ago. I know we lost but if we have to go down this is the only way to do it! Keep ur chins up….
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 18, 2022
दरम्यान, राजस्थान आणि केकेआरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्याचा विचार केला, तर राजस्थानसाठी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने एका षटकात ४ विकेट्स घेतल्या. यादरम्यान चहलने हॅट्रिक पूर्ण केली आणि सामनावीर ठरला. त्याने टाकलेल्या ३ षटकात ४० धावा खर्च केल्या आणि ५ विकेट्स नावावर केल्या. चहलच्या फिरकीमुळे केकेआरला शेवटच्या चार षटकात आवश्यक असलेल्या ४० धावा करता आल्या नाहीत.
केकेआरला नाणेफेक जिंकून देखील पराभव पत्करावा लागला. प्रथम गोलंदाजी करताना केकेआर राजस्थानला मर्यादित धावसंख्येवर रोखू शकला नाही. राजस्थानसाठी सलामीवीर जोस बटलरने सर्वाधिक १०३ धावा केल्या. तर दुसरीकडे केकेआरसाठी कर्णधार श्रेयसने सर्वाधिक ८५ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने ५ विकेट्सच्या नुकसानावर ११७ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या केकेआरने शेवटच्या षटकांमध्ये झटपट विकेट्स गमावल्या. परिणामी १९.४ षटकात केकेआरने २१० धावा करून सर्व विकेट्स गमावल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रॅली ड्रायव्हर संजयचे अडीच वर्षांनी पुनरागमन, थायलंडमधील क्रॉसकंट्री रॅली मालिकेतील सहभागासाठी सज्ज
IPL2022| लखनऊ वि. बेंगलोर सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
बिंग ब्रेकिंग! पुण्यात होणाऱ्या दिल्ली वि. पंजाब IPL सामन्याचे ठिकाण बदलले, कोरोना ठरलंय कारण