आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शुबमन गिलने लहानपणीचा एम मजेशीर किस्सा सांगितला आहे. गुजरात टायटन्समधील त्याचे सहकारी खेळाडू गुरकीरत सिंग मान आणि जयंत यादव यांच्यासोबत चर्चा करताना त्याने काही खुलासे केले आहेत. शुबमनने सांगितल्यानुसार तो ही अंधश्रद्धा मानत असायचा की, त्याच्या वरिष्ठ खेळाडूंच्या बॅटने खेळला, तर त्याला जास्त धावा करता येतील.
शुबमन गिल (Shubman Gill) खूप कमी काळात नावारूपाला आलेला भारतीय क्रिकेटपटू आहे. गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) सहकारी खेळाडूंसोबत बोलताना तो म्हणाला की, “जेव्हा मी लहान होतो, तेव्हा मी पाजीची (गुरुकीरत सिंग मान) खूप नक्कल करायचो, जेव्हा कधी ते फलंदाजी करायचे. मी तर त्यांच्या बॅटचाही जास्तीत जास्त वापर करायचो, जी मझी अंधश्रद्धा होती. मला वाटायचे की, जर त्यांच्या बॅटसह खेळायला उतरलो, तर मी खूप धावा करेल.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शुबमन गिलने हा किस्सा सांगितल्यानंतर चर्चेत उपस्थित असेलला गुरकीरत सिंग मान (Gurkeerat Singh Mann) यानेही मजेशीर प्रत्युत्तर दिले. शुबमनने जेव्हा सांगितेल की, तो अंधश्रद्धेपोटी गुरकीरच्या बॅटने खेळायचा, त्यावर गुरकीरत म्हणाला की, “हो पण आता वेळ बदलली आहे. आता मी त्याच्या बॅटचा वापर करतो.”
त्यावेळी उपस्थित असलेला जयंत यादव (Jayant Yadav) शुबमनला म्हणाला की, “मला वाटते की, तुला (शुबमन) ही गोष्ट माहिती नाहीये. जेव्हा आम्ही बेंगलोरमध्ये होतो, मी गुरकीरत आणि करण शर्मा जेवण करत करत होतो. त्यावेळी गुरकीरतने आम्हाला तुझ्याविषयी खूप गोष्टी सांगितल्या होत्या.”
गुजरात टायटन्सचे खेळाडू शुबमन गिल, गुरकीरत सिंग मान आणि जयंत यादव यांनी या कार्यक्रमात अनेक विषयी चर्चा आणि खुलासे केले. गुजरात टायटन्ससाठी हा त्यांचा पहिला आयपीएल हंगाम आहे आणि संघाने उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. शुबमन गिलला त्यांनी ड्राफ्टच्या रूपात संघात सामील केले होते. चालू हंगामात तो गुजरातच्या डावाची सुरुवात करताना दिसला आहे. गुरकीरत आणि जयंतला अद्याप गुजरातकडून पदार्पणाची संधी मिळालेली नाहीये.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आम्ही चुका केल्या, ज्याचे परिणाम भोगावे लागले’, पराभवानंतर हार्दिक पंड्याने सांगितली कुठे झाली चूक
लखनऊने जिंकली मनं! आईच्या सन्मानासाठी खेळाडू खास जर्सीसह उतरणार पुण्याच्या मैदानात
“वॉर्नर सरावापेक्षा जास्त पार्ट्या करायचा, सतत टीममेट्सशी भांडल्यामुळे संघाबाहेरही केले होते”