---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेच्या नवख्या अष्टपैलूला राजस्थान रॉयल्सने दिली संधी, पाहा त्याची कारकीर्द

On: रविवार, मे 15, 2022 12:36 PM
Corbin-Bosch
---Advertisement---

आयपीएल २०२२ च्या साखळी फेरीतील अवघे काही सामने खेळायचे बाकी असताना राजस्थान रॉयल्सने युवा खेळाडूला खरेदी केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू कॉर्बिन बॉशला राजस्थान संघात संधी मिळाली आहे. बदली खेळाडूच्या रूपात सहभागी झालेला बॉश लखनऊविरुद्ध रविवारी (१५ मे) खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.

२७ वर्षीय कॉर्बिन बॉश (Corbin Bosch) अद्याप राष्ट्रीय संघासाठी पदार्पण करू शकलेला नाहीये. त्याने २४ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ८२७ धावा केल्या आहेत आणि ५१ विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० मधील १५ डावांमध्ये त्याने १२०.८० च्या स्ट्राईक रेटने  १५१ धावा केल्या आहेत. यामध्ये नाबाद ३२ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. गोलंदाजीमध्ये त्याने २९ डावांमध्ये ८११ धावा खर्च केल्या आणि १८ विकेट्स घेतल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान, राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा महत्वाचा खेळाडू नॅथन कुल्टर नाइल दुखापतीमुळे मार्च महिन्यात चालू हंगामातून बाहेर पडला होता, त्याच्या बदली खेळाडूच्या रूपात कॉर्बिन बॉशला संधी मिळाली आहे. राजस्थानला साखळी फेरीताल अजून फक्त दोन सामने खेळायचे आहेत आणि संघाने बॉशला घेण्यासाठी २० लाख रुपये बेस प्राइस खर्च केली आहे.

दरम्यान, रविवारी राजस्थान रॉयल्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्ससोबत होणार आहे. हा सामना जिंकून प्लेऑफमधील स्थान भक्कम करण्याच्या विचारात राजस्थानचा संघ आहे. जर लखनऊने हा सामना जिंकला, तर लखनऊ प्लेऑफमध्ये जागा पक्की करेल आणि राजस्थानसाठी मात्र अडचणी वाढतील. लखनऊने हा सामना जिंकल्यावर राजस्थानने जरी त्यांचा शेवटचा सामना जिंकला, तरी अनेक गोष्टी नेट रन रेटवर आवलंबून असतील.

संघासोबत सहभागी होण्यासाठी कार्बिन बॉशला विदेशातून यावे लागणार नाहीये. कारण तो आधीपासूनच संघाच्या कॅम्पमध्ये आहे. संघाचा खेळाडू बनण्यापूर्वी बॉश राजस्थानच्या नेट गोलंदाजाची भूमिका पार पाडत होता. संघ व्यवस्थापनाला त्याने स्वतःच्या प्रदर्शनाने प्रभावित केले असल्यामुळे त्याला संघात घेतले गेले असू शकते.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

आंद्रे रसेलच्या ‘वादळा’पुढे सनरायझर्स हैदराबाद उडाले, ऐतिहासिक कामगिरी करत पोलार्ड-गेलला मागे सोडले

आंद्रे रसेलचा हैदराबादविरुद्ध ‘अष्टपैलू’ खेळ, कोलकाताने ५४ धावांनी जिंकली रोमांचक लढत

‘टीमला आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली असती, पण…’, आरसीबीसाठी खेळलेल्या क्रिकेटरचे गाऱ्हाणे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---