जगभरातील प्रसिद्ध टी२० लीग म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या १४व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्य यांच्यात लढत झाली. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा युवा अष्टपैलू डेवाल्ड ब्रेविसला आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली. मुंबई इंडियन्सकडून त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात करणारा ब्रेविस या टप्प्यापर्यंत पोहोचण्याआधी अनेक कारणास्तव चर्चेत राहिला. आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा २०२२ त्याने चांगलीच गाजवली होती.
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषकात ब्रेविसने दक्षिण आफ्रिका संघाचे प्रतिनिधित्व केले होते आणि मालिकावीर देखील ठरला होता. त्याने या स्पर्धेत एकूण ५०६ धावा केल्या होत्या. डेवाल्ड ब्रेविस (Dewald Bravis) मैदानात असताना ज्या पद्धतीने चपळाई दाखवतो आणि मैदानाच्या चारही बाजूंना फटके मारतो, त्यामुळे त्याची तुलना एबी डिविलियर्सशी (AB De Villiers) केली जाते. दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज एबी डिविलिअर्स त्याच्या फटकेबाजीसाठी ओळखला जायचा. ब्रेविसला दक्षिण आफ्रिकेचा पुढचा डिविलियर्स मानले जात असून चाहते त्याला ‘बेबी एबी’ या नावाने ओळखतात.
फक्त चाहतेच नाही, तर स्वतः ब्रेविस देखील एबी डिविलियर्सचा मोठा चाहता आहे आणि नेहमी त्याच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करताना दिसतो. याच पार्श्वभूमीवर त्याच्या खेळीत डिविलियर्सची झलक पाहायला मिळते. एवढेच नाही, तर ब्रेविसच्या जर्सीचा क्रमांक आणि डिविलियर्सच्या जर्सीचा क्रमांक देखील एकसारखाच आहे. दोघेही १७ क्रमांकाची जर्सी घालतात.
DB shining brightly on his #TATAIPL debut. ⭐💙
After 7 overs, we are ➡️ 39/1#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #KKRvMI pic.twitter.com/BA92Hfc3ks
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2022
एकोणीस वर्षांखालील विश्वचषकात डेवाल्ड ब्रेविसचे प्रदर्शन पाहून आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने त्याला खरेदी करण्यासाठी तब्बल ३ कोटी रुपये खर्च केले. विश्वविजेत्या भारतीय संघाचा कर्णधार यश धूल आणि इतर भारतीय १९ वर्षाखालील खेळाडूंच्या तुलनेत ब्रेविस सर्वात महागडा ठरला. ब्रेविसचे वय सध्या १८ वर्ष आणि ३४३ दिवस आहे. तो आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंमध्ये ५व्या क्रमांकावर पोहोचला आहे. अशाप्रकारे स्वतःच्या पहिल्याच आयपीएल सामन्यात त्याने एका मोठ्या विक्रमाची नोंदही केली आहे.
आयपीएल पदार्पणाच्या या सामन्यात ब्रेविस मुंबईसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा (३) स्वस्तात बाद झाला आणि ब्रेविस मैदानात आला. त्याने १९ चेंडू खेळून २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २९ धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १५२.६३ होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या ‘बेबी एबी’ची आयपीएल पदार्पणातच कमाल, मैदानात पाय टाकताच केला खास विक्रम
पॅट कमिन्सकडून मुंबईच्या गोलंदाजांनी मनसोक्त धुलाई! अवघ्या १४ चेंडूत झळकावले विक्रमी अर्धशतक
MI vs KKR | मुंबईची पराभवाची हॅट्रिक, कमिन्सच्या विक्रमी अर्धशतकाच्या जोरावर कोलकाताचा शानदार विजय