इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये शनिवारी (२६ मार्च) पार पडणार आहे. सर्व संघांची तयारी सध्या सुरू आहे. सनरायजर्स हैद्राबाद संघसुद्धा आयपीएलची तयारी करत आहे. संघाचा पहिला सामना राजस्थान राॅयल्स संघाविरुद्ध पार पडणार आहे. आयपीएल २०२१ मध्ये हैदराबाद संघ काही खास कामिगरी करु शकला नाही. १४ व्या हंगामात संघ आठव्या स्थानावर होता. संघाने १४ पैकी फक्त ३ सामने जिंकले होते.
स्टार भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या (Bhuvneshwar Kumar) उपस्थितीत देखील संघाच्या वेगवान गोलंदाजांनी काही खास कामगिरी करू शकले नाहीत. यावेळी फ्रॅंचायझीने संघाची गोलंदाजी धारदार बनवण्यासाठी दक्षिण आफ्रिकाचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन (Dale Steyn) गोलंदाजी प्रशिक्षक बनवले आहे. ‘स्टेन गन’ या नावाने ओळखला जाणाऱ्या या गोलंदाजाच्या मार्गदर्शनाखाली हैदाराबाद संघ आयपीएलची तयारी करण्यात व्यस्त आहे.
डेल स्टेनने एका विशेष सत्रामध्ये नटराजनशिवाय इतर खेळाडूंना याॅर्कर चेंडू अजून प्रभावी बनवण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. स्टेन हा शेवटच्या षटकांमध्ये अचूक गोलंदाजी करतो. संघाने त्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
हैद्राबाद संघाने शेअर केलेल्या व्हिडीओत नटराजन, भुवनेश्वर कुमार आणि बाकी खेळाडू याॅर्कर टाकताना दिसत आहेत. यासाठी स्टंप्सपासून काही अंतरावर एक बूट ठेवण्यात आला आणि त्यावर चेंडू टाकण्यास सांगितले. यामध्ये सर्व गोलंदाजांनी स्टेनच्या मार्गदर्शनाखाली बूटाच्या दिशेने चेंडू टाकले. मागील हंगामात नटराजनने दूखापतीमुळे फक्त २ सामने खेळले आहेत. त्यामुळे आता त्याचे पुनरागमन हैद्राबादमध्ये कसे होणार आहे, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.
Extra protection for the toes on your boots this season, batters? #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/DZNPPRFPTe
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 25, 2022
हैद्राबाद संघाजवळ उमरान मलिकच्या रुपात वेगवान गोलंदाज आहे, जो १५० किमी प्रति तासच्या वेगाने गोलंदाजी करतो. तो सरावादरम्यान चांगली कामगिरी करताना दिसत आहे. संघाजवळ सीन एबाॅट आणि मार्को यान्सेन हे सुद्धा वेगवान गोलंदाज आहेत. २९ मार्चला हैद्राबाद संघ आपला पहिला सामना राजस्थान संघासोबत खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या पराभवाने भारताला फायदा, कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत गाठला ‘हा’ क्रमांक
युवा खेळाडूंबाबत काय बोलून गेला दिल्लीचा कर्णधार रिषभ? म्हणे, ‘२ महिन्यात कोणाला सुपरहिरो नाही…’
‘जॉब डन’ म्हणत जेव्हा धोनीने २०२१मध्येच दिले होते सीएसकेचे नेतृत्त्व सोडण्याचे संकेत, पाहा Video