गुरुवारी (दि. ०५ मे) आयपीएल २०२२मधील ५०वा सामना ब्रेबॉर्न स्टेडिअम येथे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. हा सामना दिल्लीने २१ धावांनी आपल्या नावावर केला. हा दिल्लीचा हंगामातील पाचवा विजय होता. पराभवानंतर हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन म्हणाला की, एका बाजूने त्याचा संघ दबावात होता. उरलेल्या सामन्यांमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीत जोमाने काम करावे लागेल. असे असले, तरीही हैदराबादने सामना गमावण्यामागे केन विलियम्सनचा झेल कारणीभूत असल्याचे म्हणले जात आहे.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) निर्धारित २० षटकात २०७ धावा चोपल्या आणि हैदराबादला २०८ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाला ८ विकेट्स गमावत फक्त १८६ धावाच करता आल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सामन्यानंतर केन विलियम्सन (Kane Williamson) म्हणाला की, “एक संघ म्हणून आमच्यावर दबाव होता. दिल्लीच्या फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारली होती. डेविड वॉर्नर (David Warner) आणि रोवमन पॉवेल (Rovman Powell) यांनी शानदार फटकेबाजी केली.” मात्र, यावेळी त्याने आपल्या खराब क्षेत्ररक्षणाबद्दल एक शब्दही काढला नाही. त्याने रोवमन पॉवेलचा १८ धावांवर खेळत असताना झेल सोडला होता. यानंतर पॉवेलने नाबाद राहत ६७ धावा चोपल्या होत्या. म्हणजेच त्याने ४९ धावा अधिकच्या जोडल्या. सामन्यात हाच हैदराबादच्या पराभवाचा टर्निंग पॉईंट ठरला. वॉर्नर ९२ धावा करून नाबाद राहिला आणि सामनावीर पुरस्कारही त्याच्या नावावर झाला. त्याने पॉवेलसोबत ११ षटकांमध्ये १२२ धावांची धडाकेबाज भागीदारी रचली.
उमरान मलिकच्या गोलंदाजीवर विलियम्सनने सोडला होता पॉवेलचा झेल
दिल्ली कॅपिटल्सची धावसंख्या १४व्या षटकानंतर ३ विकेट्स गमावत १३५ इतकी होती. त्यावेळी पॉवेल १४ चेंडूत १८ धावांवर खेळत होता. १५वे षटक टाकण्यासाठी हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आला होता. यावेळी त्याच्या पहिल्याच चेंडूवर पॉवेलने मोठा फटका मारला. यावेळी त्याचा चेंडू मिड ऑफवर उभा असलेल्या विलियम्सनकडे गेला. त्याच्याकडे पाहून असे वाटले की, तो हा झेल घेईल. मात्र, विलियम्सनला सोपा झेलही घेता आला नाही. यानंतर पुढील २० चेंडूंत पॉवेल ४९ धावांची मोठी खेळी खेळला. म्हणजेच, त्याने २४५च्या स्ट्राईक रेटने धावा चोपल्या. त्याने २०व्या षटकात उमरानच्या गोलंदाजीवर ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १९ धावाही काढत संघाच्या धावसंख्येत मोलाची भर पाडली. त्यामुळे दिल्लीला २०० धावांचा आकडा पार करता आला.
१० सामन्यात २०० धावाही करता नाही आल्या
यंदाच्या हंगामात केन विलियम्सनला त्याच्या बॅटमधून खास कामगिरी करता आली नाही. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याची गाडी लांबचा पल्ला गाठूच शकली नाही. तो ११ चेंडू खेळून फक्त ४ धावांवरच बाद झाला. त्याला चालू हंगामात १० सामन्यांमध्ये २२च्या सरासरीने फक्त १९९ धावाच करता आल्या आहेत. म्हणजेच त्याला नीट २०० धावाही करता आल्या नाहीत. त्याने यादरम्यान फक्त १ अर्धशतक केले आहे. हैदराबादच्या २ खेळाडूंनी म्हणजेच, अभिषेक शर्मा आणि एडन मार्करम यांनी ३००हून अधिक धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी म्हतारा होतोय’, सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर असं का म्हणाला वॉर्नर, वाचा सविस्तर
Video: भुवनेश्वरने ऐनवेळी बदलली भूमिका, मग वॉर्नरनेही अफलातून शॉटने दाखवला आपला क्लास