आयपीएल २०२२ च्या २१ व्या सामन्यात हार्दिक पांड्याचा गुजरात टायटन्स आणि केन विलियम्सनच्या नेतृत्वातील सनरायझर्स हैदराबाद संघ आमने सामने होते. गुजरातने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली, पावर प्लेमध्ये गुजरातने ५१ धावा खर्च करून दोन विकेट्स गमावल्या होत्या. अशात हार्दिक पांड्याला लवकर मैदानात यावे लागले. मैदानात अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि वेगवान गोलंदाज उमरान मलिक यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला.
सामन्यात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) तिसऱ्या क्रमांकावरील साई सुदर्शन बाद झाल्यानंतर मैदानात उतरला. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर हार्दिकने वेगवान गोलंदाज टी नटराजनला चौकार मारला आणि तो कोणत्या विचारासह मैदानात आला आहे, हेदेखील स्पष्ट केले. हार्दिक पांड्या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला, पण वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) याचा एक चेंडू त्याच्या हेलमेटला जाऊन लागला. उमरानने हा चेंडू साधारणतः १४० किमी ताशी वेगान टाकला असावा, ज्याचा हार्दिकला लवकर अंदाज आला नाही. परिणामी हा वेगात आलेला चेंडू त्याच्या हेलमेटला जाऊन लागला.
उमरानने टाकलेला हा खतरनाक बाउंंसर हेलमेटवर लागल्यानंतर हार्दिक हैराण झाल्याचे पाहायला मिळाले. सुदैवाने त्याला कोणती गंभीर दुखापत झाली नाही. त्याने तत्काळ तो ठीक असल्याची पुष्टी केली. पण पुढच्याच दोन चेंडूवर हार्दिकने त्याला लागलेल्या या चेंडूची कसर भरून काढली. उमरानने टाकलेल्या पुढच्या दोन्ही चेंडूवर हार्दिकने चौकार ठोकले. विशेष गोष्ट ही आहे की, हार्दिकने या दोन्ही चेंडूंवर ताकत कमी आणि गोलंदाजाच्या गतीचा उपयोग जास्त केला. चाहत्यांकडून हार्दिकच्या या खेळीचे कौतुक केले जात आहे.
https://twitter.com/Raj93465898/status/1513527432678371332?s=20&t=sFVgl1QyHT6V_lbWcuiHPA
दरम्यान, उमरान मलिकने सामन्यात चांगल्या गतीसह गोलंदाजी केली, पण तो संघासाठी पुन्हा एकदा महागात पडला आहे. या युवा गोलंदाजाने सामन्यात टाकलेल्या ४ षटकांमध्ये ३९ धावा खर्च केल्या आणि एक विकेट नावावर केली. यादरम्यान त्याचा इकोनॉमी रेट ९.७५ होता. तर दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने ४२ चेंडूत कर्णधारपदाला साजेशी ५० धावांची खेळी केली.
प्रथम फलंदाजी करताना गुजरातने ७ विकेट्सच्या नुकसानावर १६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्से हैदराबादने १९.१ षटकात १६८ धावा करून आणि ८ विकेट्स राखून विजय मिळवला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
गुजरातविरुद्ध उमरानला नाही मिळाले अपेक्षित यश, तरीही भाऊची सोशल मीडियावर चर्चा; कारणही तसंच
एकच पण जबरदस्त! हार्दिक पंड्याची सनरायझर्स विरुद्ध खास ‘सेंच्यूरी’, थेट विश्वविक्रमाला गवसणी
तब्बल ११ वाईड फेकत भुवीची लाजिरवाण्या विक्रमास गवसणी, स्वप्नातही विचार न केलेली कामगिरी नावावर!