सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात आयपीएल २०२२चा ५४वा सामना खेळला गेला. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फॉफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकांमध्ये चांगलीच धुलाई केली आणि आरसीबीला मोठी धावसंख्या उभी करून दिली. या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी चाहते सोशल मीडियावर त्याचे कौतुक करत आहेत.
आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात आरसीबीने अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याला संघात घेण्यासाठी मोठ्या किंमत मोजली होती. आरसीबीने कार्तिकवर दाखवलेल्या या विश्वासाला आता तो पात्र ठरला आहे. हंगामातील पहिल्या सामन्यापासून कार्तिकने धमाकेदार फलंदाजी केली आहे आणि यष्टीपाठी महत्वाच्या झेल देखील घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रविवारी (८ मे) सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कार्तिकने अवघ्या ८ चेंडूत नाबाद ३० धावा चोपल्या. यामध्ये त्याच्या एका चौकाराचा, तर ४ षटकारांचा समावेश होता. डावाच्या अंतिम षटकातील शेवटच्या चार चेंडूमध्ये त्याने सलग तीन षटकार, तर एक चौकार मारला. कार्तिकच्या या धमाकेदार खेळीनंतर आरसीबीने मर्यादिक २० षटकात १९२ धावा साकारल्या. यासाठी त्यांच्या तीन खेळाडूंनी विकेट्स गमावल्या.
कार्तिकने दिलेल्या योगदानासाठी चाहत्यांनी त्याला चांगलेच डोक्यावर घेतले आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे. सोशल मीडियावरील प्रतिक्रिया पाहिल्या तर चाहते कार्तिकला आगामी विश्वचषकात संधी देण्याची मागणी करत आहेत. यावेळी एका युजरने लिहिले की, “ना इशान किशन, ना संजू सॅमसन, आम्हाला टी२० विश्वचषकाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दिनेश कार्तिकच फिनिशर किंवा यष्टीरक्षक म्हणून हवा. वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याचा स्ट्राईक रेट वेगळ्याच लेव्हलला असतो.”
Not Ishan kishan not Sanju Samson, we need Dinesh Karthik in playing xi as a Finisher or Wicket keeper for T20 WC. His strike rate especially against Pacers is at different level.
— #BlockBusterDevara⚓🇮🇳 (@ChinnuTarak333) May 8, 2022
याव्यतिरिक्त अनेक युजर्स आपापल्या प्रतिक्रिया मांडत आहेत.
30run
8 ball 😎#IPL #RCBvsSRH #SRHvRCB #dk #dineshkarthik pic.twitter.com/YmbKIk7j36— DK Popa (@DK_Popa_) May 8, 2022
Dinesh Karthik’s formula to bat: Come – Smash – Smile – Win hearts ♥️ #IPL20222 #DK @DineshKarthik @IPL
— Vishal Dhiman (@dhiman51811) May 8, 2022
Swagga 😂💚#DK #SRHvsRCB pic.twitter.com/ADpmtmyMgu
— B I L L A (@Sobinbilla7) May 8, 2022
Dinesh Karthik, Every team's dream finisher! #SRHvRCB#IPL2022
— Ajitdeep (@CHAIHOLIC_) May 8, 2022
https://twitter.com/Shamsihaidri1/status/1523271872837681152?s=20&t=aXkRTUUeaQt9xCl4KB-7iA
Dinesh Karthik in the final overs 🔥#RCBvSRH #SRHvsRCB #SRHvRCB pic.twitter.com/8rbb8gQIhJ
— Siju Moothedath (@SijuMoothedath) May 8, 2022
आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली खराब फॉर्मशी झगडत आहे आणि या सामन्यात तो पुन्हा एकदा अपयशी ठरला. विराट हैदराबादविरुद्ध स्वतःचे खातेही खोलू शकला नाही. कर्णधार आणि सलामीवीराची भूमिका पार पाडणाऱ्या फाप डू प्लेसिसने ५० चेंडूत सर्वाधिक ७३ धावा केल्या. त्याव्यतिरिक्त तिसऱ्या क्रमांकावरील रजत पाटीदारने ३८ चेंडूत ४८, तर ग्लेन मॅक्सवेलने २४ चेंडूत ३३ धावांचे योगदान दिले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘उद्या परीक्षा आहे, एकतर गोल्डन डक हो किंवा शतक मार, नाहीतर…’, विराटने केली चाहतीची मागणी पूर्ण
युवराज आणि पीटरसनमध्ये ट्वीटरवॉर, एकाच्या उत्तराला दुसऱ्याकडून वरचढ प्रत्युत्तर; एकदा वाचा