इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२२ च्या पाचव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ६१ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात एक प्रसंग असा घडला, ज्याविषयी सोशल मीडियावर सध्या खूप चर्चा होत आहे. हैदराबादचा कर्णधार यष्टीपाठी झेलबाद झाला, पण चाहत्यांना विलियम्सन बाद असल्याची कसलीही खात्री नाहीये. चाहते पंचांच्या या निर्णायवर संशय व्यक्त करत आहेत.
सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) याला ज्या पद्धतीने या सामन्यात बाद दिले गेले, त्याविषयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विवाद होत आहेत. चाहत्यांच्या म्हणण्यानुसार स्लीपमध्ये उभा असलेल्या देवदत्त पडीक्कलने विलियम्सनचा झेल बरोबर घेतला नव्हता, तरीही त्याला बाद दिले गेले. विलियम्सन सात चेंडूत दोन धावा करून प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर झेलबाद झाला.
Shame on you @IPL and Team @rajasthanroyals for this kind of Decisions , @BCCI should check Umpires eyes . Apologize to #KaneWilliamson . pic.twitter.com/E1yEDyLvyA
— Kamlesh Kumar Suthar (@iamkamlesh95) March 30, 2022
हेही वाचा – ख्रीस गेलच्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढच्या IPL हंगामात गेल करणार पुनरागमन? वाचा काय आहे गुड न्यूज
सामन्याच्या दुसऱ्या षटकात सनरायझर्स हैदराबातला विलियम्सनच्या रूपात मोठा झटका बसला. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू त्याच्या बॅटचा बाहेरचा किनारा घेऊन स्टंपच्या मागे गेला. यष्टीरक्षक संजू सॅमसनने झेल पकडण्यासाठी डाईव्ह मारली पण चेंडू त्याच्या दस्तान्याला लागला आणि स्लीपमध्ये उभा असलेल्या पडीक्कलच्या हातात गेला. पडीक्कलने झेल घेतला खरा, पण त्याविषयी संशय उपस्थित होत आहे.
Poor showcase of third umpiring..
Baised decision from third umpire @JimmyNeesh#KaneWilliamson #poorumpiring #IPL #srhvsrr pic.twitter.com/bq67OVBk0L— Rahul Kumar (@rahul98891) March 29, 2022
पडीक्कल स्वतः देखील हा झेल घेतल्यानंतर संभ्रमात असल्याचे दिसला. यानंतर फिल्डवरील पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या पंचांचा रिप्ले पाहिल्यानंतर विलियम्सनला बाद करार दिला गेला. रिप्लेमध्ये हे स्पष्ट दिसू शकले नाही की, चेंडू पडीक्कलच्या हातात होता की, आधी जमिनीला लागला.
https://twitter.com/Sachin10fans/status/1508889774408728576?s=20&t=I0sYdC7KCJMzLExdSfYkbg
चाहत्यांना तिसऱ्या पंचाने दिलेला हा निर्णय जराबी पटला नाहीय आणि सोशल मीडियात ते याविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. सामन्याचा विचार केला, तर सनरायझर्स हैदराबादला विजयसाठी २११ धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात त्यांचा संघ ७ विकेट्सच्या नुकसानावर १४९ धावा करू शकला.
महत्वाच्या बातम्या –
आठवतंय का? आजच्याच दिवशी पाकिस्तानला चारीमुंड्या चित करत टीम इंडियाने गाठली होती विश्वचषकची फायनल
‘पंजाबी तडका अन् कॅरेबियन मस्ती!’, शिखर धवनने विंडीज खेळाडूंसह धरला ठेका, Video व्हायरल
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियन महिला ९ व्यांदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये, वेस्ट इंडिज सेमीफायनलमध्ये पराभूत