आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व संघ जोमात सराव करत आहेत. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज टी नटराजन देखील या हंगामात पुनरागमन करणार आहे. तत्पूर्वी नटराजनने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व फलंदाजांसाठी एकप्रकारे खुले आव्हान दिली आहे. सनरायझर्स हैदराबादच्या सराव सत्रादरम्यान नटराजनने एक असा घातक चेंडू टाकला की खेळपट्टीवरील स्टंपचे दोन तुकडे झाले आहेत.
वेगवान गोलंदाज टी नटराजन (T Natarajan) दुखापतीच्या कारणास्तव आयपीएल २०२१ मध्ये सहभाग घेऊ शकला नव्हता. परंतु, आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि पुन्हा आयपीएलच्या मैदानात पुनरागमन करणार आहे. २०२० हंगामात त्याने सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hydarabad) संघासाठी जबरदस्त प्रदर्शन केले होते. याच कारणास्तव मागच्या महिन्यात पार पडलेल्या आयपीएलच्या मेगा लिलावात सनरायझर्स संघाने ४ कोटी रुपये खर्च करून त्याला संघात पुन्हा सामील केले.
सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये नटराजनने त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सादर केला आहे. व्हिडिओत दिसत आहे, नटराजनने टाकलेला चेंडूने स्टंपचे दोन तुकडे केले आहेत. चाहत्यांकडून व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात लाइक्स मिळत आहेत.
https://www.instagram.com/reel/CbUbCAElb3N/?utm_source=ig_web_copy_link
नटराजन आता नवीन यॉर्कर किंग या नावाने नावारूपाला येत आहे. आयपीएल २०२० मध्ये त्याने विक्रमी ७१ यॉर्कर चेंडू टाकले होते. भारतीय दिग्गज जसप्रीत बुमराह २६ यॉर्करसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसचे कार्तिक त्यागी २८ यॉर्करसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या जबरदस्त प्रदर्शनामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये पदार्पणाची संधी मिळाली होती. आगामी आयपीएल हंगामात त्याच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे.
आईपीएल २०२२ मधील सनरायझर्स हैदराबादचा पूर्ण संघ –
केन विलियमसन, अब्दुल समद, उम्रान मलिक, वाशिंगटन सुंदर, निकोलस पूरन, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, प्रियम गर्ग, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल, जगदीश सुचिथ, एडेन मार्कराम, मार्को जेन्सेन, रोमारियो शेफर्ड, सीन एबॉट, आर समर्थ, सौरभ दुबे, शशांक सिंह, विष्णु विनोद, ग्लेन फिलिप्स, फजलहक फारूकी
महत्वाच्या बातम्या –
षटकारांच्या ‘या’ शानदार विक्रमात सीएसकेचा धोनीच ‘सिक्सर किंग’, विस्फोटक गेल टॉप-५मध्येही नाही
सोळा तास मैदानावर घालवले.. ६७३ चेंडू खेळला.. विंडीज कर्णधार ब्रेथवेटने मोडला १८ वर्षे जुना विक्रम
किंगखानला भेटण्याच्या प्रतिक्षेत केकेआरचा कर्णधार! श्रेयस अय्यर म्हणतोय, ‘मी त्या क्षणाची…’