आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. यावर्षी आठ ऐवजी दहा संघांसोबत स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी १४ किंवा १५ मार्चपासून खेळाडूंचा सराव सुरू होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) आणि बीसीसीआय (BCCI) यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली आहे. बैठकीत सर्व संघांना सरावासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी पाच मैदान निवडले गेले आहेत. सर्व संघ मुंबई आणि ठाण्यातील मैदानांवर सराव करणार आहेत
अशी माहिती मिळाली आहे की, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) बांद्रा कुर्ला परिसर, ठाण्याचे एमसीएस स्टेडियम (MCA Stadium), डीपाई पाटील विश्वविद्यालय मैदान (DY Patil University Ground), सीसीआय (Cricket Club Of India) सोबतचे फुटबॉल मैदान, तसेच घनसोलीमधील रिलायन्स कार्पोरेट पार्क मैदान या ठिकाणावर संघ सराव करणार आहेत. खेळाडू ८ मार्चपर्यंत याठिकाणांवर पोहोचतील, अशी शक्यता आहे. याठिकाणी त्यांना विलकगीकरणात राहावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
माध्यामांतील वृत्तानुसार सरावासाठी नेमून स्टेडियमवर पोहोचण्यापूर्वी सर्वा खेळाडूंना ४८ तासांपूर्वीचा कोरोना आरटी-पीसीआर चाचणी केलेला अहवाल सादर करावा लागणार आहे. खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था मुंबईतील १० आणि पुण्यातील दोन हॉटेल्समध्ये केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
यावर्षी स्पर्धेतील लीग स्टेजचे सामने मुंबई आणि पुण्यात आयोजित केले जाणार आहेत. प्लेऑफनंतरच्या सामन्यांविषयी अद्याप कसलीही माहिती दिली गेली नाही.
मागच्या जवळपास दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहे आणि आयपीएलचे मागचे दोन्ही हंगाम बायो बबलमध्ये आयोजित केले गेले होते. यावर्षीही खेळाडूंना बायो बबलचे पालन करावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्टेडियममध्ये ४० टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार आहे. काही दिवसांनंतर स्टेडियममध्ये प्रवेश मिळणाऱ्या प्रेक्षकांची ही क्षमता वाढवलीही जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या –
‘जे खेळाडू आयपीएल खेळत नाही, त्यांना राष्ट्रीय संघात संधी मिळत नाही’, भारतीय गोलंदाजची खंत
रोहित शर्मा ज्या मैदानात बनणार कसोटी कर्णधार, त्या मैदानाशी विराट कोहलीचे स्पेशल कनेक्शन
साल १९९२ च्या क्रिकेट विश्वचषकाची दुसरी ओळख म्हणजे ‘मार्टिन क्रो’