---Advertisement---

‘जे खेळाडू आयपीएल खेळत नाही, त्यांना राष्ट्रीय संघात संधी मिळत नाही’, भारतीय गोलंदाजची खंत

On: गुरूवार, मार्च 3, 2022 1:43 PM
Team-India-Siddharth-Kaul
---Advertisement---

भारतीय संघातून (Team India) बाहेर केला गेलेला वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल (Siddharth Kaul) याने मनातील खंत व्यक्त केली आहे. त्याच्या मते आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळत आहे, पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करणाऱ्या अनेकांकडे दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान, सिद्धार्थ कौल २०१९ पासून भारतीय संघातून बाहेर आणि आगामी आयपीएल हंगामात खेळताना दिसणार आहे.

सिद्धार्थने २०१८ मध्ये पहिल्यांदा भारतीय संघात पदार्पण होते. त्यावेळी त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी संघात निवडले गेले होते. या ३१ वर्षीय गोलंदाजाने आतापर्यंत भारतीय संघासाठी ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. नवीन गोलंदाजांना संधी देण्यासाठी सिद्धार्थला संघातून वगळले गेले होेत आणि त्यानंतर त्याला पुन्हा संधीच मिळाली नाही. २००८ मध्ये १९ वर्षाखालील विश्वचषक विजेत्या संघातही त्याचा सहभाग होता. विराट कोहली या १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार होता.

स्पोर्ट्स यारीसोबत बोलताना कौल म्हणाला की, “सध्यास्थितीत आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करणेच संघाची निवड प्रक्रिया बनली आहे. असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये अप्रतिम प्रदर्शन केले आहे, पण त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष जात नाही. सध्या प्रत्येक जण आयपीएलची चर्चा करतो. टीव्हीवर देशांतर्गत क्रिकेटचे प्रसारण होत नाही. जे खेळाडू आयपीएल खेळत नाहीत, त्यांना राष्ट्रीय संघात संधी मिळत नाहीय.”

सिद्धार्थ सध्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी विलगीकरणात आहे. रणजी ट्रॉफीच्या मागच्या हंगामात त्याने चांगेल प्रदर्शन केले होते. याविषयी बोलताना तो म्हणाला की, “जर तुम्ही माझे मागच्या वर्षीचे आकडे पाहिले, तर मी रणजीमध्ये पाच सामन्यात २८ विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये तीन वेळा ५ विकेट्सचा हॉल माझ्या नावावर केला होता आणि एक हॅट्रिकही घेतली. टर्निंग ट्रॅकवर मी दोन वेळा ५ विकेट्स हॉल नावावर केला. असे असले तरी, माझ्यावर कोणाचीच नजर पडली नाही. एवढेच नाही, तर माझी निवड भारत अ संघातही झाली नाही.”

दरम्यान, आगामी आयपीएमध्ये कौल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळताना दिसणार आहे. ६४ प्रथम श्रेणी सामन्यांमधअये त्याच्या नावावर २३७ विकेट्स आहेत. यामध्ये त्याने १५ वेळा ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तर १० वेळा ४ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन २७ धावा खर्च करून ६ विकेट्स घेण्याचे राहिले आहे. लिस्ट ए मधील त्याच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने ९९ सामन्यांमध्ये १७० विकेट्स घेतल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –

विराट १०० वा कसोटी करणार खास? ३८ धावा करताच सचिन, द्रविड, सेहवागच्या पंक्तीत बसण्याची संधी

महिला वनडे विश्वचषकातील ‘ही’ आकडेवारी पाहून तुम्हीही म्हणाल, ‘पाकिस्तान भारताच्या आसपासही नाही’

विनोद कांबळीचा ‘टाईट’ असतानाचा व्हिडिओ व्हायरल, गाडी ठोकल्यामुळे झालेली अटक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---