इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा नवाकोरा हंगाम लवकरच सुरू होत आहे. येत्या २६ मार्च रोजी आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा पहिला सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने असतील. मात्र या सामन्यापूर्वी मुंबईतून धक्कादायक बातमी पुढे आली आहे.
वानखेडेतील आयपीएल सामन्यापूर्वी दहशतवाद विरोधी पथकाने (Anti-Terrorism Squad) दहशतवादी संघटनेच्या एका व्यक्तीला पकडले आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ही बातमी बीसीसीआयला दिली आहे, ज्यानंतर वानखेडे स्टेडियमकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
खेळाडूंच्या हॉटेल्सची केली गेली रेकी?
माध्यमांतील वृत्तांनुसार, दहशतवादी संघटनेतील काही लोकांनी मुंबई स्थित वानखेडे स्टेडियमची रेकी केली आहे. इतकेच नाही तर, मुंबईतील आयपीएल संघांच्या हॉटेल्सची रेकी केली गेल्याचीही माहिती पुढे आली आहे. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. मुंबई पोलिसांनी याबद्दलचीही माहिती बीसीसीआयला दिली आहे. त्यानंतर प्रशासनाकडून वानखेडे स्टेडियमची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दहशतवादी विरोधी पथकाने दहशतवादी संघटनेतील एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशीही केली आहे. या चौकशीदरम्यान दहशतवाद्याने आयपीएल संघांच्या हॉटेलची रेकी केली गेल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी वानखेडे स्टेडियमची सुरक्षा अजून कठोर करण्याचे ठरवले आहे. पहिल्या आयपीएल सामन्यादरम्यान कोणत्याही दर्शकाला खेळाडूजवळ न जाऊ देण्याची दक्षताही मुंबई पोलिसांकडून घेतली जाईल.
हेही वाचा- थलायवन इरुकिंद्रन! सीएसकेच्या नव्या कर्णधाराची आली पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाला जडेजा
गृहमंत्र्यांनी सांगितलं सत्य
याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “आयपीएलला दहशतवाद्यांचा कोणताही धोका नाही. वानखेडे स्टेडियमची दहशतवाद्यांकडून कोणतीही रेकी करण्यात आलेली नाही. यासंदर्भात माध्यमांमध्ये चालवल्या जाणाऱ्या बातम्या निराधार आहेत”, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, मुंबई पोलिसांनीही या बातम्यांचे खंडन करणारे अधिकृत पत्रक जारी केले आहे.
पहिल्या आयपीएल सामन्यासाठी यातून निवडली जाईल प्लेइंग इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्ज संघ – रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, दीपक चाहर, केएम आसिफ, तुषार देशपांडे, ड्वेन ब्राव्हो, डेवॉन कॉनवे, शुभ्रांशू सेनापती, तुषार देशपांडे, शिवम दुबे, महिश तिक्षणा, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सँटनर, प्रशांत सोळंकी, सी हरी निशांत, एन जगदीसन, ख्रिस जॉर्डन, के भगत वर्मा, मुकेश चौधरी, सिमरनजीत सिंग
कोलकाता नाईट रायडर्स संघ – आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, पॅट कमिन्स, नितीश राणा, श्रेयस अय्यर, शिवम मावी, शेल्डन जॅक्सन, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, रसिक दार, बाबा इंद्रजित, चमिका करुणारत्ने, अभिजित तोमर, प्रथम सिंग, अशोक शर्मा, सॅम बिलिंग्ज, ऍलेक्स हेल्स, चीम साऊथी, रमेश कुमार, उमेश यादव, मोहम्मद नबी, अमन खान
महत्वाच्या बातम्या-
जड्डूचा ‘सर’ जडेजा करण्यात माही भाईचाच आहे सिंहाचा वाटा; बोटाला धरून शिकवलंय
गेली १२ वर्षे धोनीच होता सीएसकेचा संघनायक, पण त्याने ‘या’ खेळाडूच्या कॅप्टन्सीखाली खेळलाय एक सामना
धोनी वि. जडेजा, हसावं की रडावं अशी आकडेवारी; चेन्नईचे चाहते मोक्कार टेन्शनमध्ये