इंडियन प्रीमियर लीग २०२२ (IPL 2022) ची चाहते अतुरतेने वाट पाहत आहेत. ही देशांतर्गत सर्वात मोठी टी२० लीग आहे. यावर्षीची आयपीएल २६ मार्च पासून सुरु होणार आहे. तत्पूर्वी आयपीएलचा मेगा लिलाव (IPL 2022 Mega Auction) पार पडला आणि यामध्ये सर्व फ्रॅंचायझींनी आपले संघ तयार केले असून १२ मार्चपासून सराव करताना दिसणार आहेत. आयपीएलचे वेळापत्रक नूकतेच जाहीर झाले आहे, पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. यावर्षी आयपीएलमध्ये ८ संघ खेळताना दिसणार आहेत. आयपीएलचे सर्व सामने मुंबई आणि पुणे येथे खेळले जाणार आहेत. आयपीएल २०२२ मध्ये सीएसकेकडून ऋतुराज गायकवाड सह हे तीन खेळाडू सलामीसाठी येऊ शकतात. या लेखात आपण या तीन खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.
१. राॅबिन उथप्पा
आयपीएला अनुभव असलेला खेळाडू आणि भारतीय यष्टीरक्षक राॅबिन उथप्पा हा सीएसके संघासाठी ऋतुराज गायकवाडसोबत सलामीसाठी येऊ शकतो. उथप्पाने आयपीएलच्या मागील काही हंगामांमध्ये केकेआरकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. तो सलामीला आल्यानंतर चांगली कामगिरी करतो. त्यामुळे त्याचे ऋतुराजसोबत डावाची सुरुवात करू शकतो. त्याने आयपीएलमध्ये १९३ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये १३०.२ च्या स्ट्राईक रेटने ४७२२ धावा केल्या आहेत. तसेच, २५ अर्धशतके देखील झळकवली आहेत. त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम धावासंख्या ८७ आहे. मागील हंगामात त्याने सीएसकेसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती. आता पुन्हा एकदा तो सीएसकेच्या जर्सीमध्ये दिसणार आहे.
२. डेवॉन कॉनवे
न्यूझीलंडचा फलंदाज डेवॉन कॉनवेला आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात सीएसके संघाने १ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. मागील काही काळात हा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकला आहे. त्याने न्यूझीलंड संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने त्याच्या खेळीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने लिलावात नाव दिले होते. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये पदार्पण केले नव्हते, परंतु त्याने न्यूझीलंडसाठी टी२० लीगमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. त्याने न्यूझीलंडसाठी २० टी२० सामन्यांमध्ये ५०.२ च्या सरासरीने ६०२ धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याने ४ अर्धशतके देखील लगावली आहेत. त्याची सर्वोत्तम खेळी टी२० लीगमध्ये नाबाद ९९ धावा ही आहे. त्यामुळे तो सलामी उत्तमप्रकारे करू शकतो.
३. एन जगदीशन
चेन्नई सुपर किंग्स संघासोबत मागील काही काळापासून खेळत असलेला एन जगदीशन हा आयपीएल २०२२ मध्ये ऋतुराजसोबत सलामीसाठी येऊ शकतो. आत्तापर्यंत सीएसकेने त्याला जास्त खेळण्याची संधी दिली नाही, परंतु या खेळाडूजवळ मोठी आणि चांगली खेळी खेळण्याची क्षमता आहे. एन जगदीशनने आत्तापर्यंत देशांतर्गत ३५ टी२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ३५.१० च्या सरासरीने ७०२ धावा केल्या आहेत. यामध्ये ४ अर्धशतक लगावली आहेत. त्याची टी२० लीगमधील सर्वोत्तम खेळी ७८ धावा एवढी आहे. या खेळाडूकडे सीएसकेसाठी चांगली सुरुवात करण्याची क्षमता आहे. जर सीएसकेने ऋतुराजसारखा याच्यावर सुद्धा विश्वास दाखवला, तर तो सीएसकेला उत्तम सुरुवात करून देऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
‘जडेजाला धावांची भूक, जे संघहिताचेच’, कर्णधार रोहितने कौतुकाने थोपटली पाठ
‘मोहाली कसोटी जडेजासाठी ओळखली जाईल’, भारताच्या मोठ्या विजयानंतर माजी क्रिकेटरची स्तुतीसुमने
कपिल देवचा विक्रम मोडल्यानंतर आर अश्विन भावुक; म्हणाला, ‘मी क्रिकेटचा आभारी, मला कधीच वाटले…’