---Advertisement---

प्रथमच ‘जावया’ला सपोर्ट करण्यासाठी आले शेट्टी कुटुंब, पण राहुलने ‘गोल्डन डक’ होत केली निराशा; मीम्स व्हायरल

On: सोमवार, एप्रिल 11, 2022 4:56 PM
---Advertisement---

आयपीएल २०२२ च्या २० व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत झाली. या सामन्यात राजस्थानने अवघ्या ३ धावांनी विजय मिळवला. शेवटच्या षटकात लखनऊला विजयासाठी १५ धावांची आवश्यकता होती आणि मार्कस स्टोइनिस खेळपट्टीवर होता. परंतु वेगवान गोलंदाज कुलदीप सेनने पदार्पणाच्या सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि राजस्थनला विजय मिळवून दिला. दरम्यान लखनऊचा कर्णधार केएल राहुल एकही धाव करून शकला नाही आणि याच कारणास्तव चाहते त्याची प्रेयसी आथिया शेट्टीवर मिम्स शेअर करत आहेत.

लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स (LSG vs RR) यांच्यातील हा सामना पाहण्यासाठी बॉलिवुड अभिनेता सुनिल शेट्टीआणि पत्नी मैदानात उपस्थित होते. तसेच त्याची मुलगी आथिया शेट्टी (Athiya Shetty) हिनेही हजेरी लावली होती.

केएल राहुल (Kl Rahul) आणि आथिया यांच्यातील प्रेमसंबंध सर्वांनाचा माहिती असून, भविष्यात ते विवाहबंधनात देखील पडू शकतात. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण शेट्टी कुटुंब केएल राहुलच्या नेतृत्वातील लखनऊ संघाच्या समर्थनार्थ मैदानात उपस्थित राहिले होते, पण राहुल ग्लोडन डक (डावाच्या पहिल्या चेंडूवर बाद) झाल्यामुळे त्यांची चांगलीच निराशा झाली.

लखनऊने सामना गमावला असला, तरी त्यांचा कर्णधार केएल राहुलची मात्र चर्चा होत आहे. राहुल शून्य धावांवर क्लीन बोल्ड झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पाडला आहे. आथिया आणि सुनील शेट्टी यांच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्ट दिसत होती. चाहत्यांनी याचे फोटो आणि व्हिडिओंचे मिम्ससाठी भांडवल तयार केले आहे. शेट्टी कुटुंबावर बनलेले मिस्म सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

https://twitter.com/AbdullahNeaz/status/1513218046063943681?s=20&t=5H5RH_cK9gBEZCRTxiT1Uw

https://twitter.com/Adityakrsaha/status/1513186845592793088?s=20&t=p_dG7hy2dY7n7bAwUq_X4A

https://twitter.com/kunaalyaadav/status/1513147970954227715?s=20&t=9Hjc5NIUYzVLvzO2FaF7mA

दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर केएल राहुने सामना सुरू होण्याआधी नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजस्थानने दिलेल्या १६६ धावांच्या लाक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी राहुल आणि क्विंटन डी कॉक ही सलामीवीर जोडी मैदानात आली. पहिल्या षटकात राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आला होता आणि षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने राहुलला त्रिफळाचीत केले. बोल्टचा चेंडू उत्कृष्टरित्या स्विंग झाला आणि राहुलची विकेट घेतली. स्वतः राहुल देखील या जबरदस्त चेंडूमुळे हैराण असल्याचे दिसले. राजस्थान रॉयल्स या विजयानंतर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---