आयपीएल २०२२ चा हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. सर्व संघ आगामी आयपीएल हंगामासाठी सज्ज आहेत. मेगा लिलावात सर्व संघांनी स्वतःच्या गरजेप्रमाणे खेळाडूंवर बोली लावली आणि त्यांना विकत घेतले. मुंबई इंडियन्सला एका वेगवान गोलंदाजाची आवश्यकता होती आणि त्यांनी इंग्लंडच्या टायमल मिल्सला संघात सामील केले आहे. मुंंबईकडे जसप्रीत बुमराहसारखा दिग्गज वेगवान गोलंदाज आधीपासूनच आहे, ज्याच्यासोबत गोलंदाजी करण्यासाठी मिल्स उत्सुक आहे.
मागच्या महिन्यात आयपीएल २०२२ च्या पार्श्वभूमीवर मेगा लिलाव आयोजित केला गेला होता. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने १.५ कोटी रुपयांमध्ये इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज टायमल मिल्स (Tymal Mills) याला विकत घेतले आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मिल्स मिळून विरोधी संघाचा चांगलाच समाचार घेऊ शकतात. मिल्स इंग्लंड संघासाठी १२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे आणि यामध्ये ११ बळी घेतले आहेत.
मुंबई इंडियन्स सर्वाधिक ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा संघ आहे. आगामी हंगामात २७ मार्चपासून मुंबईच्या अभियानाची सुरुवात होईल. त्यांचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे. त्यापूर्वी मुंबई इंडियन्सने मिल्सचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओत मिल्स म्हणत आहे की, “विश्वचषकादरम्यान बुमराहसोबत थोडा वेळ घालवण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे त्याच्यासोबत खेळण्यासाठी तयार आहे.”
यापूर्वी आयपीएल २०१७ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळणाऱ्या मिल्सने पुढे बोलताना सांगितले की, “मी बऱ्याच दिवसांपासून पुनरागमनासाठी इच्छुक होतो आणि ही संधी मिळाल्यामुळे आनंदी आहे. सगळ्या नव्या सहकाऱ्यांची भेट घेण्यासाठी उत्सुक आहे. नक्कीच मुंबई एक अप्रतिम फ्रेंचायझी आहे. मी आधी कधीच वानखडे स्टेडियममध्ये खेळलो नाहीय. ही २०१७ नंतर माझी पहिलीच वेळ आहे.”
आयपीएल २०२२ साठी मुंबई इंडियन्सचा संपूर्ण स्क्वॉड –
रोहित शर्मा (१६ कोटी), जसप्रीत बुमराह (१२ कोटी), सूर्यकुमार यादव (८ कोटी), कीरोन पोलार्ड (६ कोटी), ईशान किशन (१५.२५ कोटी), डेवाल्ड ब्रेविस (३ कोटी), बासिल थम्पी (३० लाख), मुरुगन अश्विन (१.६० कोटी), जयदेव उनादकट (१.३० कोटी), मयंक मार्कण्य (६५ लाख रुपये), एन. तिलक वर्मा (१.७० कोटी), संजय यादव (५० लाख रुपये), जोफ्रा आर्चर (८ कोटी), डेनियल सैम्स (२.६० कोटी रुपये), टायमल मिल्स (१.५० कोटी रुपये), टिम डेविड (८.२५ कोटी रुपये), रिले मेरेडिथ (१ कोटी रुपये), अनमोलप्रीत सिंह (२० लाख रुपये), अरशद खान (२० लाख रुपये), रमनदीप सिंग (२० लाख रुपये), राहुल बुद्धि (२० लाख रुपये), रितिक शौकीन (२० लाख रुपये), अर्जुन तेंदुलकर (३० लाख रुपये), आर्यन जुयाल (२० लाख रुपये), फैबियन एलन (७५लाख रुपये).
महत्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये नव्याने सामील झालेल्या गुजरात टायटन्स संघाची नवीन जर्सी लाँच; २८ मार्चला फुंकणार रणशिंग
निवृत्तीनंतर श्रीसंतला मास्टरच्या शुभेच्छा; इंस्टाग्राम पोस्ट करत लिहीले ‘खास’ शब्द
INDvSL: क्लीन स्वीप देण्यापासून टीम इंडिया ९ बळी दूर; दुसरा दिवस रिषभ-श्रेयसच्या नावे