आयपीएल २०२२ च्या १२ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत झाली. लखनऊचा कर्णधार केएल राहुलने या सामन्यात कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. हैदराबादच्या सर्व गोलंदाजांची राहुलने धुलाई केली. सुरुवातीच्या विकेट्स मिळाल्यानंतर हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनची कोणतीही रणनीती कामी आली नाही. हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकची चांगलीच धुलाई केली गेली.
पाच षटकांमध्ये संघाची धावसंख्या २७ असताना लखनऊने त्यांच्या तीन महत्वाच्या विकटे्स गमावल्या होत्या. अशात संघाला एका मोठ्या भागीदारीची गरज होती. सलामीसाठी आलेला कर्णधार केएल राहुल (KL Rahul) खेळपट्टीवर कामय होता, त्याला दुसऱ्या बाजूने दीपक हुड्डा (Deepak Hooda) साथ देत होता. या दोघांमुळे पुढच्या चार षटकांमध्ये लखनऊने एकही विकेट गमावली नाही. परंतु यादरम्यान संघाला फक्त २१ धावा मिळाल्या.
टाइम आउटदरम्यान पंजाब किंग्जने स्वतःच्या रणनीतीत थोडा बदल केला आणि पुढच्या षटकात राहुल आणि हुड्डाने मिळून उमरान मलिक (Umran Malik) याने टाकलेल्या षटकात तुफान धुलाई केली. उमरानच्या चेंडूचा वेग या दोन फलंदाजांनी स्वतःची ताकत बनवला. त्या षटकात सहा पैकी चार चेंडू सीमारेषेपार गेले. उमरानने टाकलेल्या या १० व्या षटकात २० धावा खर्च केल्या.
षटकातील चौथा चेंडू उमरानने तब्बल १५१.८ किलोमीटरच्या ताशी वेगाने फेकला होता. पण राहुलने हा चेंडू जवळ येऊ दिला आणि थर्ड मॅनच्या दिशेने खेळला. उमरान वेगवान यॉर्कर टाकण्याच्या नादात फुल टॉस आणि फुल लेंथ चेंडू टाकत होता. याच कारणास्तवत त्याची चांगलीच धुलाई झाली.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून गोलंदाज रोमारिओ शेफर्डने सर्वाधिक ४२ धावा खर्च केल्या, पण सर्वात महागडा ठरला उमरान मलिक. कर्णधार विलियम्सनने उमरानला त्याच्या वाटणीचे चौथे षटक टाकण्याचीही संधी दिली नाही. त्याने टाकलेल्या ३ षटकात १३ च्या इकोनॉमीसह उमरानने ३९ धावा खर्च केल्या.
दुसरीकडे लखनऊसाठी केएल राहुलने ५० चेंडूत सर्वाधिक ६८ धावा केल्या. तसेच दीपक हुड्डानेही ३३ चेंडूत ५१ धावा केल्या. या दोघांच्या उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर लखनऊने या सामन्यात १२ धावांनी विजय मिळवला. हैदराबादचा वेगवान गोलंदाज आवेश खानने टाकलेल्या ४ षटकांमध्ये २४ धावा खर्च करून ४ विकट्स घेतल्या. या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी आवेशला सामनावीर निवडले गेले.
महत्वाच्या बातम्या –
LSGvsSRH | आवेशच्या भेदक माऱ्यानंतर होल्डरचा परिपूर्ण शेवट, लखनऊकडून हैदराबाद १२ धावांनी चितपट
केकेआरचा अष्टपैलू वेंकटेश अय्यरने अंडरटेकरची करून दिली आठवण, फोटोग्राफरला मारला ‘चोकस्लॅम’