---Advertisement---

लेट पण थेट! हुड्डाची विकेट घेत हसरंगाचा नाद खुळा विक्रम; ताहिर अन् चहलसोबत खास यादीत सामील

Wanindu-Hasaranga
---Advertisement---

आयपीएलच्या मैदानात बुधवारी (२५ मे) चाहत्यांना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात एक रंगतदार सामना पाहायला मिळाला. दोन्ही संघांनी सामना जिंकण्यासाठी आतोनात प्रयत्न केले, पण अखेरीस आरसीबीने बाजी मारली. लखनऊचा संघ १४ धावांनी पराभूत झाला. आरसीबीचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा या सामन्यात उतृष्ट फॉर्ममध्ये फलंदाजी करत असेलल्या दीपक हुड्डाला तंबूत पाढवण्याचे काम केले. या एका विकेटमुळे हसरंगाच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झाली.

आयपीएळच्या इतिहासात आता वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) हे नाव कायमचे कोरले गेले आहे. आजपर्यंतच्या इतिहासात असे दोन फिरकी गोलंदाज होऊन गेले आहेत, ज्यांनी एका आयपीएल हंगामात २५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या होत्या. दक्षिण आफ्रिकी दिग्गज इमरान ताहिर (Imran Tahir) आणि भारतीय फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांनी ही कामगिरी केली होती, पण आयपीएल २०२२ हंगामात ही यादी तीन खेळाडूंची बनली आहे. वानिंदू हसरंगाच्या रूपात या यादीत तिसरा सदस्य झाला आहे.

हसरंगाने चालू आयपीएल हंगामात खेळलेल्या १५ सामन्यांमध्ये २५ विकेट्सचा पल्ला गाठला आहे. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट ८.४५, तर सरासरी १६.१६ राहिली आहे. आयपीएल २०२२मध्ये पर्पल कॅपच्या शर्यतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आहे, ज्याने १५ सामन्यात राजस्थान रॉयल्ससाठी हंगामात सर्वाधिक २६ विकेट्स घेतल्या आहेत.

फिरकी गोलंदाज ज्यांनी एका आयपीएल हंगामात २५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत
इमरान ताहीर (आयपीएल २०१९)
युजवेंद्र चहल (आयपीएल २०२२)
वानिंदू हसरंगा (आयपीएल २०२२)*

दरम्यान, उभय संघात बुधवारी खेळला गेलेला हा एलिमिनेटर सामना, कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर पार पडला. लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने ४ विकेट्सच्या नुकसानावर २०७ धावा केल्या. यामध्ये त्यांचा वरच्या फळीतील फलंदाज रजत पाटीदारने नाबाद ११२ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. प्रत्युत्तरात लखनऊसाठी केएल राहुलने कर्णधारपदाला साजेशी ७९ धावांची खेळी केली. परंतु १९व्या षटकात तो झेलबाद झाला. परिणामी लखनऊला सामना जिंकणे शक्य झाले नाही. २० षटकात त्यांनी ६ विकेट्सच्या नुकसानावर १९३ धावा केल्या आणि १४ धावांनी पराभव स्वीकारला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

दिग्गजांचा सहभाग असलेल्या महत्वाच्या यादीत रजत पाटीदार नव्याने सामील, पाहा काय आहे विक्रम

रेड कार्डच्या स्पर्धेत डायनामाईट्सचा युनिक वानवडीवर विजय

फलंदाजीत मन जिंकलं, गोलंदाजीत मैदान जिंकलं! लखनऊला लोळवत बेंगलोरची क्वालिफायर-२ मध्ये धडक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---