---Advertisement---

अफलातून! हार्दिक पंड्याने घेतला सुपर कॅच; पण ‘त्या’ एका चुकीमुळे लिविंगस्टोनला मिळाले जीवदान

On: शनिवार, एप्रिल 9, 2022 2:09 AM
Hardik-Pandya
---Advertisement---

नवीन आयपीएल फ्रँचायझी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या त्याच्या जुन्या अंदाजात आल्याचे पाहायला मिळू लागले आहे. आयपीएल २०२२ हंगामाच्या पहिल्या सामन्यापासून हार्दिकने गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून दाखवले आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्याचा विचार केला, तर त्याने सामन्यात एक अप्रतिम झेल पकडला होता, पण तिसऱ्या पंचांनी त्याला षटकार घोषित केले. असे असले, तरी हार्दिकची चपळाई मात्र कौतुकास पात्र होती.

शुक्रवारी (८ एप्रिल) खेळल्या गेलेल्या पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स (PBKS vs GT) यांच्यातील सामन्यात हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) त्याची जुनी फिटनेस पुन्हा मिळवली असल्याचे दिसले. पंजाब किंग्जचा फलंदाजी अष्टपैलू लियाम लिविंगस्टोनने या सामन्यात स्वतःच्या संघासाठी सर्वाधिक ६४ धावा केल्या, तसे पाहिले तर डावाच्या ९व्या षटकात हार्दिक पंड्याने त्याला जवळपास बाद केलेच होते, पण तो थोडक्यात बचावला.

पंजाब किंग्जच्या फलंदाजीवेळी ९व्या षटकात अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) गोलंदाजी करत होता. मोठे शॉट खेळण्यासाठी ओळखला जाणारा लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) याने राशिदच्या या षटकातील चौथा चेंडू सीमारेषेपार मारण्याचा प्रयत्न केला. मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या हार्दिक हा झेल घेण्यासाठी त्याच्या डाव्या दिशेने धावत सुटला आणि सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू चपळाईने झेलला. तो स्वतः जेव्हा सीमारेषेच्या बाहेर जाऊ लागला, तेव्हा त्याने चेंडू मैदानात फेकला आणि पुन्हा मैदानाच्या आत येऊन झेल पूर्ण केला.

https://twitter.com/cric_big_fan/status/1512444860720050180?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1512444860720050180%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.timesnownews.com%2Fsports%2Fcricket%2Fwatch-hardik-pandya-almost-pulls-of-stunning-catch-to-dismiss-liam-livingston-touches-boundary-awarded-six-article-90732847

हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) त्याने घेतलेल्या या झेलाविषयी पूर्ण आत्मविश्वास दिसत होता, पण मैदानातील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे मदत मागितली. रिव्ह्यूमध्ये अनेकदा पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचांनी हार्दिकचा पाय सीमारेषेला खेटल्याचे उघड केले आणि लिविंगस्टोनला नाबाद करार दिला. या चेंडूवर पंजाब किंग्जला ६ धावाही मिळाल्या. लिविंगस्टोनने पुढे डावाच्या १६व्या षटकात आणि राशिद खानच्याच चेंडूवर विकेट गमावली.

पूर्ण प्रयत्न करून देखील हार्दिकचा हा झेल अयशस्वी ठरला असला, तरी तो स्वतःच्या जुन्या फॉर्ममध्ये परतत आहे, यात कसलीही शंका उरलेली नाही. मागच्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळ हार्दिक अपेक्षित प्रदर्शन करू शकला नव्हता. कंबरेच्या दुखापतीनंतर त्याला गोलंदाजीही जमली नव्हती, पण आता मात्र तो गोलंदाजी करू शकत आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

नॅथन कुल्टर-नाईलच्या जागी ‘या’ ३ पठ्ठ्यांना मिळू शकते संधी; तिसऱ्या खेळाडूने आयपीएलमध्ये घेतल्यात १६ विकेट्स

सलग ३ सामन्यात सपशेल पराभूत होऊनही मुंबईची ‘पलटण’ करू शकते धमाकेदार पुनरागमन; फक्त करावे लागेल ‘हे’ काम

अगदी सचिनपासून ते धोनीपर्यंत, भारताच्या भल्या भल्या फलंदाजांना जे जमलं नाय ते शिखरने करुन दाखवलं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---