आयपीएल २०२२च्या १६व्या सामन्यात चाहत्यांना एक रोमहर्षक विजय पाहायला मिळाला. शुक्रवारी (८ एप्रिल) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. तसेच, दुसरीकडे पंजाब किंग्जला मात्र अनपेक्षितपणे पराभवाचा सामना करावा लागला. राहुल तेवतियाने पंजाब किंग्जचे विजयाचे स्वप्न भंगवले. विजयानंतर मैदानात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
आयपीएलने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून गुजरात टायटन्सच्या विजयाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत गुजरातच्या ताफ्यात आनंदाचे वातावरण असल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे पंजाब किंग्जच्या चाहत्यांची मात्र पूर्णपणे निराशा झाल्याचे दिसत आहे. या विजयासाठी अष्टपैलू राहुल तेवतिया (Rahul Tewatia) याने ज्या पद्धतीचे योगदान दिले, त्याची बरोबरी इतर कोणताच खेळाडू करू शकणार नाही. दबावाच्या परिस्थितीत त्याने लागोपाठ दोन षटकार मारले आणि संघाला विजय मिळवून दिला.
सामना जिंकल्यानंतर गुजरात टायटन्सच्या डगआउटमध्ये बसलेले खेळाडू आणि सहकारी, सर्वजण खेळपट्टीच्या दिशेने धावत सुटले. कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) मात्र काही क्षण त्याची जागा सोडण्यासाठी तयार नव्हता. तेवतियाने शेवटच्या दोन चेंडूत दाखवलेली कमाव पाहून हार्दिकला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नसावा. नंतर सर्वजण मैदानात आल्यानंतर एकमेकांशी हातमिळवणी झाली. गुजरात टायटन्सचे चाहते आनंदात नाचत होते, तर पंजाब किंगच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला दिसला.
????????????????. ????. ????????????????????????! ???? ????@rahultewatia02 creams two successive SIXES on the last two deliveries as the @hardikpandya7-led @gujarat_titans beat #PBKS & complete a hat-trick of wins in the #TATAIPL 2022! ???? ???? #PBKSvGT
Scorecard ▶️ https://t.co/GJN6Rf8GKJ pic.twitter.com/ke0A1VAf41
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2022
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने ९ विकेट्सच्या नुकसानावर १८९ धावा केल्या. यामध्ये लियाम लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक ६४ धावांचे योगदान दिले.
प्रत्युत्तरात गुजरात टायटन्ससाठी सलामीवीर शुबमन गिलचे शतक अवघ्या ४ धावा कमी पडल्यामुळे हुकले. गिलने ५९ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकारासह ९६ धावा केल्या. गुजरातला सामना नावावर करण्यासाठी शेवटच्या २ चेंडूत १२ धावांची आवश्यकता होती. यावेळी खेळपट्टीवर राहुल तेवतिया होता, ज्याने लागोपाठ दोन षटकार मारले आणि संघाला हंगामातील सलग तिसरा विजय मिळवून दिला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
तेवतियाची नाद खुळा कामगिरी, २ गगनचुंबी षटकार ठोकत बनला ‘जड्डू’ अन् धोनीनंतरचा तिसराच खेळाडू
‘पंत जबाबदारीने खेळला, तर या आयपीएलमध्ये अपयशी ठरेल’, भारतीय दिग्गजाचा सल्ला