आयपीएल २०२२ (IPL 2022) ही देशांतर्गत सर्वात मोठी लीग २६ मार्चपासून सुरू होणार आहे. यापूर्वी सर्व संघ तयारीला लागले आहेत. राजस्थान राॅयल्सने आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात भारताच्या दोन वेगवान गोलंदाजांना मोठी बोली लावत विकत घेतले आहे, ज्यामध्ये रविचंद्रन अश्विन (R Ashwin) आणि युझवेंद्र चहलचा समावेश आहे. हे दोन खेळाडू आयपीएलच्या १५ व्या हंगामापूर्वी संघासोबत जोडले गेले आहेत आणि ते दोघे सोशल मीडियावरून एकमेकांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. चहल राजस्थान राॅयल्सचे ट्विटर अकाऊंट चालवत आहे. चहल अश्विनसोबत विनोदी गप्पा मारताना दिसत आहे.
राजस्थान राॅयल्सच्या ट्विटर अकाऊंटवरून चहलने पहिल्यांदा ट्वीट केले आहे. त्याने लिहिले की, “तू कोठे आहेस माझा प्रिय रविचंद्रन अश्विन. काही काॅल नाही, काही संदेश नाही, तुझ्या आयुष्यात दुसरं कुणी आहे का?” यावर प्रतिक्रिया देताना अश्विनने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने राजस्थान राॅयल्सची निळ्या रंगाची कॅप घातलेली दिसत आहे आणि त्याने लिहिले की, “असा विचार केला होता की गुपचूप भेटेन परंतु मी आता येथे आहे.” यावर चहल पुन्हा प्रतिक्रिया देत म्हणाला की, ‘तू गुलाबी रंगाच्या कॅपमध्येच छान दिसशील.’ नंतर अश्विन म्हणाला, “निळी कॅप परत देऊ का?”
Where are you my love @ashwinravi99 💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗 no calls no texts koi or hai kya aapki life mein? 😭😭😒😒
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 16, 2022
Thought I would just quietly blend in😂. I am here now pic.twitter.com/oZ1TbiMZHc
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) March 16, 2022
AAP pink mein cutie lagoge 💗💗💗💗💗
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 16, 2022
Blue cap vaapas de Doon?
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) March 16, 2022
अश्विनने भारत विरुद्ध श्रीलंकेच्या मोहाली कसोटीत उत्तम गोलंदाजी केली आहे. त्याने या कसोटीत कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे. कपिल देवने कसोटी क्रिकेटमध्ये ४३५ विकेट्स घेतल्या आहेत. अश्विन ४३५ विकेट्सचा विक्रम मोडत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दूसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. राजस्थान राॅयल्सचा गोलंदाज रियान परागला अश्विनकडून गोलंदाजी शिकायची आहे.
आयपीएलचा पहिला सामना केकेआर आणि सीएसके यांच्यामध्ये २६ मार्च रोजी खेळला जाणार आहे, तर अंतिम सामना २९ मे रोजी खेळला जाणार आहे. २०२२ च्या आयपीएलमध्ये एकूण १० संघ खेळताना दिसणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय, पहिल्यांदाच वनडे विश्वचषकात चारली धूळ
भारत चौरंगी मालिका खेळण्यास तयार झाला नाही, तर काय करणार पाकिस्तान? रमीज राजाने केले स्पष्ट
भज्जी पुन्हा घेणार ‘फिरकी’, करणार जोरदार ‘फटकेबाजी’; हरभजनच्या नव्या इनिंगला लवकरच सुरुवात?