इंडियन प्रीमिअर लीगची सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्ससाठी चालू हंगामाची सुरुवात खूपच निराशाजनक राहिली आहे. आता संघाचा प्रशिक्षक आणि क्रिकेट संचालक झहीर खानने संघाच्या सततच्या खरा प्रदर्शनाविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएल २०२२मध्ये संघाला अद्याप एकही विजय मिळाला नाहीय, ज्यामुळे चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे.
आयपीएल २०२२च्या पहिल्या चार सामन्यांमध्ये पराभव पत्करल्यानंतर मुंबई इंडियन्सचा क्रिकेट संचालक झहीर खान (Zaheer Khan) याला वाटते की, संघाला फक्त पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर संघ पुन्हा रुळावर येऊ शकतो. आरसीबीविरुद्ध शनिवारी (०९ एप्रिल) खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईला पराभव मिळाल्यानंतर झहीरने मत व्यक्त केले.
तो म्हणाला की, “अजून ११ लीग सामने होणार आहेत. आम्हाला पुनरागमन करावे लागणार आहे. तुम्ही या स्पर्धेत पाहिले आहे, संघ सतत पराभूत किंवा विजयी होत आहेत. ही फक्त पहिला विजय मिळवण्याची गोष्ट आहे. कधी- कधी तुम्ही दबावाच्या परिस्थितीत स्वतःवर संशय घेऊ लागता. त्यामुळे आम्हाला यावरही लक्ष ठेवावे लागेल आणि संघाला प्रेरित करावे लागेल.”
मुंबई इंडियन्स चालू हंगामात संघर्ष करताना दिसत आहे आणि याचे कारण विचारले असता झहीर खान म्हणाला की, “तुम्ही सामन्याच्या त्या क्षणांवर सतर्क राहिले पाहिजे, ज्यामुळे सामन्याची दिशा बदलू शकते. आम्ही संघाच्या रूपात से करू शकलो नाहीत. त्यामुळेच यावर लक्ष दिले पाहिजे. ज्या गोष्टी प्रभावी आहेत, त्या पॉजिटिव्ह गोष्टींवरही लक्ष दिले पाहिजे आणि त्यातूनच पुढे गेले पाहिजे. हे एक मोठे सत्र आहे, त्यामुळे आम्हाला चांगले प्रदर्शन करण्याची गरज आहे.”
दरम्यान, आरसीबीविरुद्ध एमसीएस स्टेडियमवर शनिवारी (०९ एप्रिल) खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सला ७ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबईला त्याआधीच्या सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांकडून पराभव पत्करावा लागला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –






