जगभरात कोविड-१९ चे संकट हळूहळू कमी होत आहे. तरीही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने कडक कोरोना नियमांसह इंडियन प्रीमियर लीग २०२२ चे आयोजन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ महाराष्ट्र राज्यात आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. यातील आयपीएल सामने मुंबईच्या ३ आणि पुण्याच्या एका स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. जेणेकरून खेळाडूंना जास्त प्रवास करावा लागणार नाही.
याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे, अधिकतर आयपीएल संघांना त्यांच्या घरच्या मैदानावर सामने खेळण्याची संधी मिळणार नाही. मात्र मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघासाठी परिस्थिती वेगळी आहे. कारण मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानांवर (Mumbai Indians Home Ground) साखळी फेरीतील बरेच सामने होणार आहेत.
मुंबईचे वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium), रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सचे घरचे मैदान आहे. या मैदानावर मुंबई इंडियन्स साखळी फेरीतील ४ सामने खेळेल. इतर संघ त्यांच्या घरच्या मैदानांवर सामने खेळू शकणार नाहीत. अशात मुंबई इंडियन्सला त्याच्या घरच्या मैदानावर सामने खेळल्यामुळे फायदा होणार का स्पोर्ट्सस्टारशी बोलताना मुंबईचे क्रिकेट संचालक झहीर खान (Zaheer Khan) याने आपले मत मांडले आहे. कोणत्याही संघासाठी हा फायदा किंवा नुकसान नाहीये, ते इथून नवी सुरुवात करू शकतात, असे झहीरचे म्हणणे आहे.
झहीर म्हणाला की, “मुंबई आमचे घर राहिले आहे. असे नाहीय की, आम्ही आमचे सर्व सामने वानखेडेमध्ये खेळतोय. जर तुम्ही लक्ष देऊन पाहिले तर, सर्व संघ सर्व स्टेडियमवर तुलनेने समान प्रमाणात सामने खेळत आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की, कोणत्या संघाचा फायदा होईल वा कोणत्या संघाचे नुकसान होईल. उलट माझे म्हणणे आहे की, सर्व संघ क्लिन सेटपासून सुरुवात करतील.”
मुंबई इंडियन्स संघ त्यांचा घरच्या मैदानावर अर्थात वानखेडेत ४ सामने खेळणार आहे. २१ मे रोजी वानखेडेत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्यांचा सामना होईल. त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध २४ एप्रिल रोजी, चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध १२ मे रोजी आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १७ मे रोजी मुंबई वानखेडेत खेळेल.
महत्त्वाच्या बातम्या-
डेथ ओव्हर्समध्ये फसणार का ‘डॅडी आर्मी?’, जाणून घ्या चेन्नई संघाची ताकद आणि कमजोरी
‘तुम्हाला माझी परिस्थिती माहिती नाही’, यो-यो टेस्टमध्ये नापास झाल्यानंतर पृथ्वी शॉ भावूक