सध्या इंडियन प्रीमिअर लीगचा 16वा हंगाम सुरू आहे. या हंगामात अनेक संघ नवीन कर्णधारासह उतरले आहेत. यामध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचाही समावेश आहे. हैदराबादने या हंगामात आपला आतापर्यंतचा नववा कर्णधार उतरवला आहे. तो कर्णधार इतर कुणी नसून एडेन मार्करम आहे. मार्करमने दोन महिन्यांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या एसए20 लीगमध्ये सनरायझर्स केपटाऊन संघाचे नेतृत्व करत संघाला ट्रॉफी जिंकून दिली होती. हैदराबादला मार्करमकडून आयपीएलमध्येही अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र, पहिल्याच सामन्यात मार्करम गोल्डन डक (पहिल्या चेंडूवर शून्य धावेवर बाद) पद्धतीने बाद झाला.
शुक्रवारी (दि. 7 एप्रिल) लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडिअमवर एडेन मार्करम (Aiden Markram) याने लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय लखनऊनच्या गोलंदाजांनी प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. हैदराबादच्या पहिल्या दोन विकेट्स अनुक्रमे 2.5 षटकात 21 धावांवर मयंक अगरवालच्या रूपात आणि दुसरी विकेट 7.5 षटकात 50 धावांवर अनमोलप्रीत सिंग याच्या रूपात पडली. त्यानंतर चौथ्या स्थानी कर्णधार एडेन मार्करम (Captain Aiden Markram) उतरला.
लखनऊचा गोलंदाज कृणाल पंड्या हैदराबादच्या डावातील आठवे षटक टाकत होता. पाचव्या चेंडूवर अनमोलप्रीतची विकेट पडल्यानंतर मार्करम फलंदाजीला उतरला होता. यावेळी कृणालने पुढच्याच म्हणजे सहाव्या चेंडूवर मार्करमला शून्य धावेवर तंबूत धाडले. मार्करम यावेळी पहिल्याच चेंडूवर एकही धाव न करता तंबूत परतल्याने त्याने चाहत्यांना निराश केले. यावेळी तोदेखील खूपच निराश दिसला. यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
Krunal Pandya on song here!
Picks up two key wickets in as many deliveries.
Anmolpreet Singh and Aiden Markram depart.
Live – https://t.co/7Mh0bHCrTi #TATAIPL #LSGvSRH #IPL2023 pic.twitter.com/33W5Uf4Gpv
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2023
हैदराबादचा डाव
मार्करम बाद झाला तेव्हा 8 षटकात हैदराबादने 3 विकेट्स गमावत फक्त 50 धावा केल्या होत्या. त्यानंतर राहुल त्रिपाठी 35 धावा करून संघाला 94 धावांपर्यंत पोहोचवून बाद झाला. त्याच्यानंतर इतर फलंदाजही नियमित अंतराने बाद झाले. 19व्या षटकापर्यंत हैदराबादने 7 विकेट्स गमावत 108 धावा केल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या षटकात अब्दुल समद याने 2 षटकार मारत संघाला 8 विकेट्स गमावत 121 धावा करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. (ipl 2023 aiden markram clean bowled by krunal pandya video viral see here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लखनऊची ताकद वाढली! IPLमध्ये दीडशेहून अधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय धुरंधराचे संघाकडून पदार्पण
कोण बनणार भारताचा पुढचा कर्णधार? सॅमसनचे नाव घेत एबी डिविलियर्सची मोठी भविष्यवाणी