इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड चमकला. ऋतुराजने चेन्नईच्या पहिल्या डावात 92 धावांची वादळी खेळी केली. त्याने या खेळीत एकूण 9 षटकारांची बरसात केली. सामन्यादरम्यान त्याने चारही बाजूंना धावा काढल्या. या खेळीमुळे भारतीय संघाचा माजी दिग्गज अनिल कुंबळे हादेखील प्रभावित झाला. त्याने ऋतुराजच्या षटकारांवर मोठे भाष्य केले.
काय म्हणाला कुंबळे?
ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) सामन्यादरम्यान लावलेल्या 9 षटकारांनंतर अनिल कुंबळे (Anil Kumble) हादेखील प्रभावित झाला. तो मजेशीर अंदाजात म्हणाला की, “हा खूपच मोठा आकडा आहे. इतके तर मी माझ्या कारकीर्दीतच मारले असतील. ऋतुराजला तुम्ही षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये मोजत नाहीत, पण त्याने सहजरीत्या सर्व शॉट खेळले. त्याच्या फलंदाजीवरून वाटले नाही की, तो यावेळी बळजबरी किंवा ताकदीचा वापर करत आहे.”
https://twitter.com/Stumptalktous/status/1641805427213058051?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1641805427213058051%7Ctwgr%5Eb85d35d82ba38cd8de9c227cbe9eb99510968ae1%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news24online.com%2Fsports%2Fcricket%2Fipl-2023-anil-kumble-happy-for-seeing-rituraj-gaikwad-six-hitting-brmp%2F196643%2F
ख्रिस गेलनेही केली प्रशंसा
अनिल कुंबळेव्यतिरिक्त विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल यानेही ऋतुराजची प्रशंसा केली. गेलने जिओ सिनेमाच्या शोवर म्हटले की, “होय, त्याने आज रात्री आयपीएलच्या पहिल्या सामन्यात आपल्या फलंदाजीने आग लावली आहे. त्याने सहजरीत्या आपले सर्व शॉट खेळले. तो निश्चितच शतकाचा हक्कदार होता. त्याने वास्तवात चांगली फलंदाजी केली. दोन युवा फलंदाज, शुबमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांनी खरंच चांगली फलंदाजी केली.”
ऋतुराजची खेळी
गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Gujarat Titans vs Chennai Super Kings) संघात पार पडलेल्या पहिल्या सामन्यात गुजरात संघ विजयी झाला. चेन्नईने हा सामना गमावला असला, तरीही या सामन्यात चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याने यादरम्यान 50 चेंडूत 92 धावांची विस्फोटक खेळी साकारली. त्याने या धावा करताना 4 चौकार आणि 9 षटकारांचा पाऊस पाडला.
चेन्नई सुपर किंग्स संघाचा पुढील सामना सोमवारी (दि. 3 एप्रिल) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यातही ऋतुराजकडून संघाला अशाच खेळीची अपेक्षा असेल. (ipl 2023 anil kumble happy for seeing ruturaj gaikwad six hitting gt vs csk)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘इम्पॅक्ट प्लेअर’चा निर्णय फसला! ‘या’ 5 कारणांमुळे चेन्नईला गुजरातपुढे टेकावे लागले गुडघे
नाणेफेकीवेळी रवी शास्त्रींकडून मोठी चूक, पंड्याला म्हटले ‘या’ महिला संघाचा कर्णधार, तोही हसला; Video