---Advertisement---

कपड्यांप्रमाणे संघ बदलणारा ‘हा’ खेळाडू दिल्लीच्या गोटात, आयपीएलमध्ये झळकावून बसलाय शतक

On: शनिवार, डिसेंबर 24, 2022 12:41 PM
Manish-Pandey-And-KL-Rahul
---Advertisement---

शुक्रवारी (दि. 23 डिसेंबर) कोची येथे पार पडलेला आयपीएल 2023 मिनी लिलाव अनेक खेळाडूंसाठी नशीब बदलणारा ठरला. काहींना मूळ किंमतीच्या दुपटीहून अधिक रक्कम मिळाली, काहींना आतापर्यंतची आयपीएल इतिहासातील सर्वाधिक रक्कम मिळाली, तर काहींना मागील वर्षीच्या तुलनेत काही कोटी रक्कम कमी मिळाली. या मिनी लिलावात असा एक भारतीय खेळाडूही होता, ज्याला आपल्या संघात खरेदी करण्यासाठी कोणताही तयार नसल्याचे वाटत होते, परंतु त्याच्यावर विश्वास ठेवत एका संघाने त्याला करोडपती बनवले. तो खेळाडू इतर कुणी नसून मनीष पांडे आहे. त्याला संघात घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स संघात चांगलीच शर्यत पाहायल मिळाली.

मनीष पांडेला खरेदी करण्यासाठी बेंगलोर आणि दिल्लीमध्ये जबरदस्त शर्यत
आयपीएल 2023 लिलावात (IPL 2023 Mini Auction) भारतीय फलंदाज मनीष पांडे (Manish Pandey) याच्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) हे आमने-सामने होते. 1 कोटी मूळ किंमत असलेल्या मनीषला दिल्ली संघाने बाजी मारत 2.40 कोटींमध्ये आपल्या ताफ्यात सामील केले. या बोलीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण, लिलावापूर्वी असे म्हटले जात होते की, मनीषला कोणताच खरेदीदार मिळणार नाही. तसेच, त्याची आयपीएल कारकीर्द संपुष्टात येईल. मात्र, मनीषला दिल्लीचा आधार मिळाला आणि आता तो दिल्लीच्या जर्सीत जलवा दाखवताना दिसेल.

प्रत्येक वर्षी दुसऱ्या संघाची जर्सी परिधान करतो मनीष पांडे
मनीष पांडे हा आयपीएलच्या सुरुवातीपासून खेळत आहे. त्याने 2008मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर पुढे तो 2009-10 हंगामात मनीष बेंगलोर संघाच्या जर्सीत दिसला होता. त्यानंतर त्याने 2011-13 हंगामात पुणे वॉरिअर्स इंडियाचे प्रतिनिधित्व केले होते. सन 2014 ते 2017 या हंगामात मनीष कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. यादरम्यान त्याने खूप प्रसिद्धी कमावली होती. यादरम्यान त्याला जुलै 2015मध्ये भारतीय संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.

मनीष पांडेची कारकीर्द
मनीष पांडेच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 160 सामने खेळताना 29.90च्या सरासरीने 3648 धावा चोपल्या आहेत. यामध्ये त्याने 1 शतक आणि 21 अर्धशतकांचीही बरसात केली आहे. याव्यतिरिक्त त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 29 वनडे सामने आणि 39 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. वनडेत त्याने 33.29च्या सरासरीने 566 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची 104 ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याने वनडेत 1 शतक आणि 2 अर्धशतकेही झळकावली आहेत.

तसेच, टी20त 44.31च्या सरासरीने 709 धावा चोपल्या आहेत. यामध्ये त्याची 79 ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. मनीषने टी20त 3 अर्धशतकेही झळकावली आहेत. (ipl 2023 auction delhi capitals bought cricketer manish pandey two crores fifty lakhs)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

तिसऱ्या दिवशी भारताची जबरदस्त सुरूवात, सिराज-अश्विनने दिले यजमानांना पाठोपाठ धक्के
जेव्हा सगळ्या टीम इंडियाला सोडलं, पण हरभजन सिंगला मात्र न्यूझीलंडच्या विमानतळावर पकडलं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---