इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील सहाव सामना सोमवारी (दि. 3 एप्रिल) चेपॉक स्टेडिअममध्ये पार पडला. हा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने 12 धावांनी विजय मिळवला. हे चेन्नईचे होम ग्राऊंड असल्यामुळे सामन्याला चाहत्यांनी स्टेडिअममध्ये हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. सामन्यावर जेव्हा एमएस धोनी नाणेफेकीसाठी आला होता, तेव्हाही चाहत्यांनी एकच जल्लोष केला. धोनीला पाहून चाहतेही धोनी-धोनी नावाने ओरडत होते. जेव्हा धोनी नाणेफेकीवेळी मैदानात उपस्थित होता, तेव्हा त्याचा एक चाहता टीव्हीवर त्याची आरती ओवाळताना दिसला.
आता एमएस धोनीची आरती (MS Dhoni Aarti) ओवाळतानाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही की, अधिकतर चाहते एमएस धोनी याला देवासमान मानतात. अशातच चाहत्यांनी धोनीची आरती ओवाळून त्याच्याप्रती असलेली क्रेझ दाखवून दिली आहे.
https://twitter.com/Diptiranjan_7/status/1642790323838656512
चाहत्याने ओवाळली धोनीची आरती
व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे की, टीव्ही स्क्रीनवर धोनी दिसत आहे, तेव्हाच एक चाहता त्याची आरती ओवाळतो. त्यानंतर टीव्हीवरच धोनीला टिळा लावतो. तसेच, टीव्हीवर फुलही टाकतो. धोनी जेव्हा संघासोबत मैदानावर उतरला, तेव्हा चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
https://twitter.com/cric_aayushi/status/1642797938840866818?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1642797938840866818%7Ctwgr%5Ec827df5b1c35a1946aca79109e5fe919b33861ce%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news24online.com%2Fsports%2Fcricket%2Fipl-2023-csk-vs-lsg-fans-performed-aarti-of-ms-dhoni-watch-video-brmp%2F198471%2F
सामन्याविषयी थोडक्यात
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर लखनऊ संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी चेन्नई सुपर किंग्स संघाने 20 षटकात 217 धावा केल्या. तसेच, लखनऊ सुपर जायंट्स संघापुढे 218 धावांचे आव्हान ठेवले होते. चेन्नईकडून यावेळी ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी रचली. यात ऋतुराजच्या 31 चेंडूत 57 धावांचा समावेश होता. तसेच, कॉनवे 47 धावा करून बाद झाला. अंबाती रायुडू 27 धावांवर नाबाद राहिला, तर एमएस धोनी याने शेवटच्या षटकात 2 षटकार मारून संघाच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले.
चेन्नईच्या 218 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊ संघाला 20 षटकात 205 धावाच करता आल्या. यावेळी लखनऊकडून काईल मेयर्स याने 22 चेंडूत 53 धावांचे वादळी अर्धशतक झळकावले. तसेच, निकोलस पूरन यानेही 32 धावांचे योगदान दिले. यावेळी चेन्नईकडून गोलंदाजी करताना मोईन अली याने 4 षटकात 26 धावा खर्च करत 4 विकेट्स घेतल्या. तसेच, तुषार देशपांडे यालाही 2 विकेट्स घेण्यात यश आले. (ipl 2023 csk vs lsg fans performed aarti of ms dhoni video viral see here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तुम्ही सगळी जबाबदारी तिलकवर टाकू शकत नाहीत…’, भारतीय दिग्गजाने मुंबई इंडियन्सला सुनावले खडेबोल
ऋतुराजच्या षटकारामुळे महागड्या गाडीवर पडला डेंट, आता मिळणार 5 लाख रुपये; कारण घ्या जाणून