चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना अनिकाली राहिला. लखनऊछ्या इकाना स्टेडियमवर बुधवारी (3 मे) हे दोन संघ आमने सामने होते. सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी याने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. पण लखनऊचा डाव पूर्ण होण्याआधीच पावसाने मैदानात हजेरी लावली.
उभय संघांतील हा सामना ठरलेल्या वेळेत म्हणझे 3.30 वाजता सुरू झाला पाहिजे होता. मात्र, त्याआधी इकाना स्टेडियमवर पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना 15 मिनिट उशीरा सुरू झाला. नाणेफेक 3 ऐवजी 3.30 वाजता झाली. नाणेफेकीचा कौल चैन्नई सुपर किंग्जच्या बाजून आल्यानंतर लखनऊने प्रथम फलंदाजी केली. फलंदाजीला आलेला लखनऊ संघ 19.2 षटकात 125 धावा करू शकला. यादरम्यान लखनऊच्या 7 खेळाडूंनी विकेट्स गमावल्या.
सीएसकेसाठी मोईन अली, महिशा थिक्षाना आणि मथिशा पथिराना यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. अष्टपैलू रविंद्र जडेजा याने एक विकेट नावावर केली. लखनऊसाठी फिनिशर म्हणून फलंदाजीला आलेला आयुष बदोनी हिरो ठरला. बदोनीने 33 चेंडूत 59 धावा कुटल्या. याद 2 चौकार आणि 4 षटकार सामील होते. त्याव्यतिरिक्त लखनऊचा एकही फलंदाज 20 धावांचा टप्पा पार करू शकला नाही. (IPL 2023 CSK Vs LSG match called off due to rain.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC फायनलआधी पुजाराच्या नेतृत्वात खेळण्यासाठी स्टीव स्मिथ उत्सुक! म्हणाला, ‘आशा आहे…’
‘वेगाचा बादशाह’ डेल स्टेनही झाला ईशांतच्या गोलंदाजीचा फॅन; म्हणाला, ‘मी आतापर्यंत कधीच…’