---Advertisement---

फायनलपूर्वी आली मोठी बातमी! CSKच्या खेळाडूंना पैशांचं आमिष दाखवतो ‘हा’ खेळाडू, स्वत:च केला खुलासा

Chennai-Super-Kings
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्स संघ महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याची सीएसकेची ही 10वी वेळ होती. आयपीएल इतिहासात 10व्यांदा अंतिम सामना खेळणारा सीएसके हा पहिलाच संघ आहे. एकीकडे एमएस धोनी याचे नेतृत्व सीएसकेच्या या यशाचे रहस्य आहे, तर दुसरीकडे, संघाच्या वेगवान गोलंदाजाने खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी वेगळीच पद्धत सांगितली आहे. दीपक चाहर याने खुलासा केला आहे की, तो आपले संघसहकारी मथीशा पथिराना आणि डेवॉन कॉनवे यांना कशाप्रकारे प्रेरित करतो.

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने क्वालिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्स संघाला 15 धावांनी पराभूत करत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले होते. सीएसकेने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्स गमावत 172 धावा केल्या होत्या. तसेच, या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचा डाव 157 धावांवरच संपुष्टात आला होता. सीएसकेच्या या विजयानंतर दीपक चाहर (Deepak Chahar) याने जिओ सिनेमावर भाष्य केले होते. त्याचा यादरम्यानचा व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सीएसकेचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर म्हणाला की, “मी परदेशी संघसहकाऱ्यांना प्रेरित करण्यासाठी पैशांबाबत बोलतो. तसेच, परदेशी खेळाडूंसाठी पैशांना त्यांच्या चलनात बदलूनही सांगतो.” तो म्हणाला की, “जे परदेशी खेळाडू आहेत, त्यांच्याशी पैशांबाबत बोलतो की, जिंकलात तर बोनस चांगला मिळतो. त्यांना त्यांच्या चलनातील रक्कम सांगतो. जसे की, पथिरानाला सांगितले की, जर जिंकला, तर 9 कोटी मिळतील. श्रीलंकेच्या हिशोबाने. कॉनवेने सांगितले की, 350 डॉलर्स मिळतील. प्रेरणा पाहिजे.” दीपक चाहरचे हे वक्तव्य ऐकताच त्याच्या बाजूला उभे असलेले तिन्ही अँकर हसू लागतात.

चाहरने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात चार षटके गोलंदाजी करताना फक्त 29 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या. चाहरने वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल यांना 173 धावांच्या आव्हानाचा बचाव करताना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. चाहरने आयपीएल 2023 हंगामात आतापर्यंत 9 सामन्यात 8.63च्या इकॉनॉमी रेटने 12 विकेट्स घेतल्या आहेत.

चाहर हा आयपीएलमध्ये सर्वाधिक सर्वाधिक पैसा कमावणारा भारतीय वेगवान गोलंदाज आहे. चाहरला आयपीएल 2022च्या मेगा लिलावात सीएसकेने 14 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. तो चेन्नईकडून सर्वाधिक पैसा कमावणारा तिसरा खेळाडू आहे. त्याच्यापेक्षा जास्त पैसा सध्या बेन स्टोक्स (16.25 कोटी) आणि रवींद्र जडेजा (16 कोटी) यांना मिळतो. (ipl 2023 deepak chahar reveals how he motivated overseas players know here )

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघाच्या ‘या’ खेळाडूसाठी पुढील 6 ते 8 महिने खूपच महत्त्वाचे, दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य
WTC फायनलसाठी पंचांची घोषणा! टीम इंडियासाठी ‘अनलकी’ ठरलेले पंचही सामील

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---