जगभरातील क्रिकेटप्रेमी इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील सामन्यांचा आनंद लुटत आहेत. काहीजण घरबसल्या ही स्पर्धा पाहत आहेत, तर काही थेट स्टेडिअममधून आपल्या आवडत्या संघाचा सामना पाहत आहेत. यामध्ये खेळाडूंचे कुटुंबीयदेखील थेट स्टेडिअममध्ये हजेरी लावताना दिसत आहेत. यात युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा हिचाही समावेश आहे. धनश्री वर्मा नेहमीच आपल्या पतीच्या सामन्यांना हजेरी लावत असते. स्पर्धेतील चौथ्या सामन्यालाही तिने उपस्थिती दर्शवली होती. यादरम्यानचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील चौथा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. हैदराबादच्या 55000 प्रेक्षक क्षमता असणाऱ्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर (Rajiv Gandhi International Stadium) पार पडलेल्या या सामन्यात राजस्थानने 72 धावांनी विजय मिळवला. या विजयाने राजस्थानने स्पर्धेत शानदार सुरुवात केली. या सामन्यासाठी स्टेडिअममध्ये तुफान गर्दी झाली होती. यामध्ये युझवेंद्र चहल (Yuzvnedra Chahal) याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) हीदेखील पती आणि त्याच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडिअममध्ये पोहोचली होती. तिचा व्हिडिओ राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.
https://www.instagram.com/reel/CqiOJVOs3i7/?utm_source=ig_embed&ig_rid=1ead74cc-6f89-487b-9301-48d8d64f08ac
खरं तर, धनश्रीची राजस्थान आणि चहलला चीअर करण्यासाठी स्टेडिअममध्ये येण्याची ही पहिली वेळ नाहीये. आयपीएल 2022 स्पर्धेदरम्यानही ती राजस्थानच्या जवळपास प्रत्येक सामन्याला स्टेडिअममध्ये हजर होती. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत स्पष्टपणे दिसते की, धनश्री टाळ्यांचा कडकडाट करून चहल आणि संघाचा आत्मविश्वास वाढवत आहे.
सामन्यातील चहलची कामगिरी
दुसरीकडे, सामन्यातील युझवेंद्र चहल याच्या कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने अफलातून गोलंदाजी केली. चहलने 4 षटके गोलंदाजी करताना 17 धावा खर्च करत सर्वाधिक 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या आणि संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. चहलने विकेट घेतलेल्या खेळाडूंमध्ये मयंक अगरवाल, हॅरी ब्रूक, आदिल रशीद आणि भुवनेश्वर कुमार यांच्या नावाचा समावेश होता.
राजस्थान आयपीएल 2023मध्ये 200 धावा करणारा पहिला संघ
या सामन्यात हैदराबादचा कर्णधार भुवनेश्वर कुमार याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून सलामीवीर यशस्वी जयसवाल आणि जोस बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी 85 धावांचे योगदान दिले. त्यानंतर बटलरने 22 चेंडूत 54 धावा करत विकेट गमावली. तिथून पुढे जयसवाल (54) आणि संजू सॅमसन (55) यांनी डाव सांभाळत वेगाने धावा चोपत अर्धशतके पूर्ण केली. या तिघांच्या अर्धशतकांच्या जोरावर राजस्थानने 20 षटकात 5 विकेट्स गमावत 203 धावांचे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने 8 विकेट्स गमावत 131 धावाच केल्या. त्यामुळे राजस्थानने हा सामना 72 धावांनी जिंकला.
राजस्थानचा पुढील सामना बुधवारी (दि. 5 एप्रिल) पंजाब किंग्स संघाविरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना गुवाहाटी मैदानावर पार पडेल. (ipl 2023 dhanashree verma was seen cheering yuzvendra chahal in the stadium during srh vs rr match see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वय फक्त आकडा! 38वर्षांच्या वयातही फाफचा जबरदस्त फिटनेस, हवेत झेप घेत पकडला अविश्वसनीय कॅच; Video
मुंबईसारख्या बलाढ्य संघाला धूळ चारताच वाढला फाफचा आत्मविश्वास; म्हणाला, ‘आमची खेळी पाहून…’