---Advertisement---

IPL ट्रॉफी हुकली, पण पुरस्कार पटकावण्यात टायटन्स आघाडीवर; वाचा कुणी-कुणी कोरलं पुरस्कारांवर नाव

On: मंगळवार, मे 30, 2023 6:35 AM
GT-vs-CSK
---Advertisement---

सोमवारी (दि. 29 मे) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा चॅम्पियन बनण्याचा मान चेन्नई सुपर किंग्स संघाला मिळाला. अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार मारत अष्टपैलू रवींद्र जडेजा याने चेन्नईला पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. या सामन्याचा निकाल येण्यासाठी 20 तासांपेक्षा जास्त कालावधी लागला, पण शेवटी महेंद्र सिंग धोनी याच्या संघानेच बाजी मारली. चेन्नईने गुजरातला डकवर्थ-लुईस नियमानुसार 5 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. यासोबतच विजयी आणि उपविजयी संघांवर बक्षीसांचा पाऊस पडला. अंतिम सामन्यातील 25 चेंडूत 47 धावांच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी डेवॉन कॉनवे याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

कुणाला किती रुपये?
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने आयपीएल किताब जिंकत 20 कोटी रुपयांचे बक्षीसही मिळवले. तसेच, गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला उपविजेतेपदासाठी 12.5 कोटी रुपये मिळाले. या स्पर्धेत तिसऱ्या स्थानी राहिलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला 7 कोटी रुपये, तर चौथ्या स्थानी राहिलेल्या लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाला 6.5 कोटी रुपये मिळाले.

पर्पल आणि ऑरेंज कॅप गुजरातच्या खेळाडूंकडे
या स्पर्धेचे विजेतेपद जरी चेन्नईकडे गेले असले, तरीही वैयक्तिक विक्रम पटकावण्याच्या बाबतीत गुजरात संघ सर्वात पुढे राहिला. या हंगामात गुजरातचा सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला. गिलने या हंगामात 17 सामने खेळताना 59.33च्या सरासरीने 890 धावा चोपत ऑरेंज कॅप (Orange Cap) नावावर केली.. यामध्ये त्याने 3 शतकेही झळकावली. तसेच, गुजरातचाच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने 17 सामन्यात 7.95च्या इकॉनॉमी रेटने सर्वाधिक 28 विकेट्स घेत पर्पल कॅप (Purple Cap) आपल्याकडे ठेवली.

आयपीएल 2023 स्पर्धेतील पुरस्कारांची यादी
विजेता संघ- चेन्नई सुपर किंग्स (20 कोटी)
उपविजेता संघ- गुजरात टायटन्स (12.5 कोटी)
तिसऱ्या क्रमांकाचा संघ- मुंबई इंडियन्स (7 कोटी)
चौथ्या क्रमांकाचा संघ- लखनऊ सुपर जायंट्स (6.5 कोटी)
पर्पल कॅप- मोहम्मद शमी (28 विकेट्स) (15 लाख)
ऑरेंज कॅप- शुबमन गिल (890 धावा) (15 लाख)
प्लेअर ऑफ द मॅच (अंतिम सामना)- डेवोन कॉनवे
इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन- यशस्वी जयसवाल
मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर- शुबमन गिल
कॅच ऑफ द सीझन- राशिद खान (काईल मेयर्सचा झेल)
फेअरप्ले अवॉर्ड- दिल्ली कॅपिटल्स
मोस्ट 4s ऑफ द सीझन- शुबमन गिल
लाँगेस्ट सिक्स ऑफ द सीझन- फाफ डू प्लेसिस
पिच अँड ग्राऊंड अवॉर्ड- वानखेडे स्टेडियम आणि ईडन गार्डन्स

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! CSK ने पाचव्यांदा जिंकली IPL ची ट्राॅफी, थरारक फायनलमध्ये गुजरातचा निसटता पराभव
नवा हंगाम नवा विजेता! IPL 2023ला मिळाला ‘Purple Cap’ विनर, टॉप 5 खेळाडूंमध्ये गुजरातचे 3 धुरंधर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---