---Advertisement---

चेन्नईचा पराभव धोनीमुळेच? इंग्लंडच्या माजी दिग्गजाने सांगितलं मोठं कारण

MS-Dhoni
---Advertisement---

एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाला आयपीएल 2023च्या उद्घाटनाच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाने चेन्नईला 5 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. या पराभवानंतर चेन्नईचे चाहते नाराज झाले. शिवाय पराभवासाठी इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅमी स्वान याने चेन्नईच्या फलंदाजी क्रमाला जबाबदार ठरवले. तो म्हणाला की, संघाच्या मधल्या फळीचा क्रम योग्य नव्हता. त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

काय म्हणाला स्वान?
ग्रॅमी स्वान (Graeme Swann) याच्या मते, एमएस धोनी (MS Dhoni) हा आधी फलंदाजीला आला असता, तर स्थिती वेगळी असती. सामन्यानंतर जिओ सिनेमावर बोलताना तो म्हणाला की, “चेन्नई सुपर किंग्सची मधली फळी पूर्णत: चुकीची ठरली. एमएस धोनी याने शिवम दुबे याच्याआधी फलंदाजीला यायला पाहिजे होते.”

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) येथे रंगलेल्या आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात गुजरातने बाजी मारली. सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 178 धावा केल्या होत्या. यावेळी चेन्नईकडून फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने 50 चेंडूत 4 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 92 धावा चोपल्या. मात्र, त्याला इतर कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. चेन्नईचे हे आव्हान गुजरातने 19.2 षटकात 5 विकेट्स गमावत 182 धावा करून पूर्ण केले.

https://twitter.com/ChennaiIPL/status/1641836193242574848

खरं तर, या सामन्यात चेन्नईकडून ऋतुराजव्यतिरिक्त मोईन अली याने 23 धावा केल्या. चेन्नईचा महागडा खेळाडू बेन स्टोक्स याला फक्त 7 धावा करता आल्या. तसेच, अंबाती रायुडू याने 12 धावा आणि शिवम दुबे याने 19 धावा केल्या. एमएस धोनीने 7 चेंडूत नाबाद 14 धावा चोपल्या. संघ एकेवेळी 200 धावांचा आकडा पार करेल असे वाटत होते, पण अखेरच्या षटकात संघाला अधिक धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे चेन्नईवर गुजरातविरुद्ध सलग तीन वेळा पराभूत होण्याची नामुष्की ओढवली. आयपीएल 2023पूर्वी गुजरात आणि चेन्नई संघात आयपीएल 2022मध्ये दोन सामने खेळले गेले होते. त्यात गुजरातला यश आले होते. आता या हंगामातही चेन्नईला गुजरातकडून पराभूत व्हावे लागले. (ipl 2023 graeme swann slams chennai super kings batting order against gujarat titans)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘एवढे षटकार तर मी माझ्या आख्ख्या करिअरमध्ये…’, ऋतुराजचे सिक्स पाहून भारतीय दिग्गजाचे लक्षवेधी भाष्य
‘इम्पॅक्ट प्लेअर’चा निर्णय फसला! ‘या’ 5 कारणांमुळे चेन्नईला गुजरातपुढे टेकावे लागले गुडघे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---