इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत 47वा सामना सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. हा सामना अखेरच्या षटकापर्यंत चालला. या सामन्यात कोलकाताने अखेरच्या चेंडूवर 5 धावांनी दणदणीत विजय मिळवला. कोलकाताच्या विजयाचा शिल्पकार वरुण चक्रवर्ती ठरला. चक्रवर्तीने अखेरच्या षटकात फक्त 3 धावा खर्च करून आपल्या गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली. त्याच्या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
वरुण चक्रवर्तीने केला 9 धावांचा बचाव
आयपीएल 2023 स्पर्धेतील 47व्या सामन्यात हैदराबाद संघाला विजयासाठी अखेरच्या षटकात 9 धावांची गरज होती. यावेळी सर्वांना वाटत होते की, हा सामना कोलकाताच्या हातून निसटेल. मात्र, कर्णधार नितीश राणा (Nitish Rana) याने वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) याच्या हातात चेंडू सोपला. त्याने पहिल्याच चेंडूवर अब्दुल समदला शॉट मारण्याची संधी दिली नाही. तसेच, फक्त एक धाव खर्च केली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेत पुन्हा स्ट्राईक समदकडे गेली. यावेळी तिसऱ्या चेंडूवर समदने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण वरुणने चपळतेने धिम्या गतीचा चेंडू फेकला, त्यामुळे फलंदाज झेलबाद झाला.
चौथ्या चेंडूवर मयंक मार्कंडे धाव घेऊ शकला नाही. त्यामुळे हैदराबादला विजयासाठी 2 चेंडूत 7 धावांची गरज होती. पाचव्या चेंडूवर मयंक मार्कंडे याने 1 धाव घेऊन स्ट्राईक भुवनेश्वर कुमार याला दिली. वरुणने शेवटचा चेंडू वेगान फेकला, ज्यावर भुवनेश्वर एकही धाव घेऊ शकला नाही. अशात हैदराबादला 5 धावांनी पराभव पत्करावा लागला.
#KKR clinch a nail-biter here in Hyderabad as Varun Chakaravarthy defends 9 runs in the final over.@KKRiders win by 5 runs.
Scorecard – https://t.co/dTunuF3aow #TATAIPL #SRHvKKR #IPL2023 pic.twitter.com/g9KGaBbADy
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2023
वरुण चक्रवर्तीची प्रतिक्रिया
सामन्यानंतर वरुण चक्रवर्ती म्हणाला की, “शेवटच्या षटकात माझ्या हृदयाचे ठोके 200पर्यंत पोहोचले होते. फलंदाजाने मैदानाच्या लांब भागात चेंडू मारावा अशी माझी इच्छा होती. चेंडू खूपच सटकत होता. माझा सर्वात चांगला डाव लाँग साईडला होता. हीच माझी एकमेव आशा होती. मी माझ्या पहिल्या षटकात 12 धावा खर्च केल्या होत्या. मार्करमने माझ्या त्या षटकात 2 चौकार मारले होते. मागील वर्षी मी ताशी 85 किमी वेगाने गोलंदाजी करत होतो. मी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मला वाटले की, मला माझ्या रिव्होल्युशनवर काम करण्याची गरज आहे आणि मी त्यावर काम केले.”
Varun Chakaravarthy is adjudged Player of the Match for his bowling figures of 1/20 as #KKR snatch a thrilling victory.
Scorecard – https://t.co/dTunuF3Ie4 #TATAIPL #SRHvKKR #IPL2023 pic.twitter.com/UwnB2U6IG7
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2023
सामन्याचा आढावा
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात कोलकाता संघाने नितीश राणा (42) आणि रिंकू सिंग (46) यांच्या खेळीच्या जोरावर 9 विकेट्स गमावत 171 धावा केल्या. यावेळी हैदराबादकडून खेळताना मार्को यान्सेन आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने एडेन मार्करम (41) आणि हेन्रीच क्लासेन (36) धावांच्या जोरावर 166 धावाच केल्या. कोलकाताकडून शार्दुल ठाकूर आणि वैभव अरोरा यांनी शानदार गोलंदाजी करत प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे हा सामना कोलकाताने 5 धावांनी खिशात घातला. (ipl 2023 kkr vs srh mom varun chakaravarthy tell how he defended 9 runs in last over)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ठंड रख…’, विराट-गंभीर वादानंतर युवराजची लक्षवेधी प्रतिक्रिया, ट्वीट होतंय व्हायरल
‘हा पराभव पचवणे कठीण, आम्ही चुकाच…’, राणासेनेकडून पराभूत झाल्यानंतर हैदराबादच्या कर्णधाराची कबुली