आयपीएल 2023 मध्ये शुक्रवारी (14 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डनवर होत असलेल्या सामन्यात केकेआरचा कर्णधार नितीश राणा याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघामध्ये अष्टपैलू अभिषेक शर्माचे पुनरागमन झाले आहे. तर, केकेआरने आपल्या मागील सामन्यातील संघ कायम ठेवला.
🚨 Toss Update 🚨@KKRiders win the toss and elect to field first against @SunRisers.
Follow the match ▶️ https://t.co/odv5HZvk4p#TATAIPL | #KKRvSRH pic.twitter.com/77S1a7knB9
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2023
स्पर्धेची सुरुवात पराभवाने झाल्यानंतर दोन्ही संघांनी मागील सामन्यात विजय मिळवला होता. केकेआरने अत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत केलेले. रिंकू सिंगने अखेरच्या पाच चेंडूंवर पाच षटकार खेचत संघाला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. त्या संघात या सामन्यासाठीही बदल केला गेला नाही.
दुसरीकडे हैदराबाद संघाने आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव पाहिलेले. मात्र, त्यानंतर त्यांनी पुनरागमन करत मागील सामन्यात पंजाब किंग्सला एकतर्फी पराभूत केले. त्यामुळे आपली विजयी लय कायम राखण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरले.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
सनरायझर्स हैदराबाद – मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम (कर्णधार), हेनरिच क्लासेन, अभिषेक शर्मा, मार्को जानेसन, भुवनेश्वर कुमार, मयंक मारकंडे, उमरान मलिक, टी नटराजन
कोलकाता नाईट रायडर्स- रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), एन जगदीसन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.
(IPL 2023 KKR Won Toss And Elected To Bowl First Abhishek Sharma Backs In SRH Sqaud)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर आयपीएल फ्रँचायझींची नजर! विश्व क्रिकेटमध्ये होणार मोठी घडामोड
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेपटून लग्नबंधनात, मोठ्या काळापासून रिलेशनमध्ये असलेल्या मैत्रिणीसोबत थाटला संसार