इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 2023 स्पर्धेचा लिलाव पुढील महिन्यात म्हणजेच 23 डिसेंबर रोजी होणार आहे. अशात बीसीसीआयने खेळाडूंच्या नोंदणीसाठीही शेवटचा दिवस ठरवला आहे. बीसीसीआयने सांगितले आहे की, लिलावात सामील होण्यासाठी खेळाडूंना 15 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नाव नोंदवावे लागेल. असे म्हटले जात आहे की, सॅम करन, बेन स्टोक्स आणि कॅमेरॉन ग्रीन या लिलावातील आकर्षणाचा केंद्रबिंदू असतील.
जो रूटनेही दिलं नाव
इंग्लंड संघाचा माजी कर्णधार जो रूट (Joe Root) यानेही आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या लिलावासाठी आपले नाव नोंदवले आहे. अशी आशा व्यक्त केली जात आहे की, यावेळी त्याला एखादा संघ नक्कीच आपल्या ताफ्यात सामील करेल. रूटने 2018च्या आयपीएलमध्ये आपले नाव नोंदवले होते, पण त्याला कोणत्याही संघाने आपल्या ताफ्यात सामील केले नव्हते.
Joe Root has no expectations on salary – he just wants to experience IPL and could help his game in the ODI World Cup through IPL. (Source – Espn Cricinfo)
— Johns. (@CricCrazyJohns) November 22, 2022
आयपीएल मिनी लिलावासाठी ठरवलेल्या तारखेमध्ये बदल केला जाऊ शकतो. खरं तर, आयपीएलमधील सर्व संघांनी लिलावाची तारीख बदलण्याची मागणी केली आहे. यावर बीसीसीआय विचार करत आहे. मात्र, 23 डिसेंबर हा दिवस नाताळ सणाच्या जवळचा दिवस आहे, त्यामुळे फ्रँचायझी संघांना भीती आहे की, त्यांचे अनेक परदेशी स्टाफ उपलब्ध राहणार नाहीत. सर्व फ्रँचायझींकडे परदेशी कोचिंग स्टाफ आहे. आयपीएलच्या दहापैकी 7 संघांचे मुख्य प्रशिक्षकही परदेशी आहेत. आपल्या मुख्य प्रशिक्षकांशिवाय संघाची रणनीती बनवणे कठीण जाईल. यावर अंतिम निर्णय पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात मेगा लिलाव दोन दिवसांसाठी आयोजित केला गेला होता. मात्र, मिनी लिलाव एक दिवसासाठीच आयोजित केला जाईल.
आयपीएल संघांनी 163 खेळाडूंना रिटेन केले आहे, तर 85 खेळाडूंना करारमुक्त केले आहे. मिनी लिलावात सर्वाधिक जास्त रक्कम सनरायझर्स हैदराबादकडे असेल. हैदराबादकडे 42.25 कोटी रुपये आहेत. दुसरीकडे, पंजाब किंग्सकडे 32.20 कोटी रुपये, लखनऊ सुपरजायंट्सकडे 23.35 कोटी रुपये, मुंबई इंडियन्सकडे 20.55 कोटी रुपये आणि चेन्नई सुपर किंग्सकडे 20.45 कोटी रुपये आहेत. दिल्ली कॅपिटल्सकडे 19.45 कोटी रुपये, गुजरात टायटन्सकडे 19.25 कोटी रुपये आणि राजस्थान रॉयल्सकडे 13.20 कोटी रुपये आहेत. तसेच, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडे 8.75 कोटी आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे 7.05 कोटी रुपये आहेत. (ipl 2023 mini auction bcci fixed the last date for registration of players ben stokes and joe root sent names)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या मोठ्या खेळाडूला करायचीय सूर्यासारखी बॅटिंग; स्वत:च म्हणाला, ‘कधीकधी…’
पूरननंतर आता कोण करणार वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व? ‘या’ खेळाडूचे नाव चर्चेत