भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार आयपीएल 2023 मध्ये सीएसकेचे नेतृत्व करत आहे. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने चार आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. चालू हंगामातही सीएसके विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार ठरताना दिसत आहे. बुधवारी (3 मे) चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याची नाणेफेक धोनीने जिंकली आणि चाहत्यांसाठी एक खास संदेश दिला.
सीएसकेने या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. धोनीच्या नेतृत्वातील सीएसकेसाठी वेगवान गोलंदाज दीपक चाहर या सामन्यातून पुनरागमन करत आहे. धोनीने नाणेफेक जिंकल्यानंतर समालोचक डॅनी मॅरिसन याने धोनीने आयपीएलमधून निवृत्तीविषयी प्रश्न विचारला. यावर एमएस धोनी (MS Dhoni) म्हणाला, “ही माझी शेवटची आयपीएल आहे, असं तुम्हीच ठरवलं आहे. मी असं म्हणलो नाहीये.” धोनीच्या या विधानानंतर स्टेडियममधील चाहते भलतेच खुश झाले. धोनी आगामी आयपीएल हंगामात खेळेल, अशा अपेक्षा चाहते पुन्हा व्यक्त करू लागले आहेत.
MSD keeps everyone guessing 😉
The Lucknow crowd roars to @msdhoni's answer 🙌🏻#TATAIPL | #LSGvCSK | @msdhoni pic.twitter.com/rkdVq1H6QK
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2023
दरम्यान, सीएसके आणि लखनऊने चालू आयपीएल हंगामात पहिल्या 9 पैकी प्रत्येकी 5 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघ बुधवारी हंगामातील 10वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले. (IPL 2023 MS Dhoni’s Big Statement on IPL Retirement)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश थिक्षाना.
लखनऊ सुपर जायंट्स – कायल मेयर्स, मनन व्होरा, कर्ण शर्मा, आयुष बदोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या (कर्णधार), कृष्णप्पा गौथम, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, मोहसिन खान.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लखनऊविरुद्ध सामन्यात दीपक चाहरचे कमबॅक, नाणेफेक जिंकून धोनीने घेतली गोलंदाजी
दिल्लीविरुद्ध केलेल्या घातक वेगवान गोलंदाजीबाबत शमीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘मी माझ्या…’