---Advertisement---

ऑरेंज कॅपसाठी युवा अन् अनुभवी खेळाडूमध्ये काट्याची टक्कर! ‘या’ फलंदाजांमध्ये फक्त 1 धावेचे अंतर

On: शुक्रवार, मे 12, 2023 6:17 PM
Yashasvi-Jaiswal-And-Faf-Du-Plessis
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत आतापर्यंत 56 सामने खेळले गेले आहेत. या स्पर्धेत अनुभवी खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून नव्या दमाचे युवा खेळाडू विक्रमांचे मनोरे रचत आहेत. विशेष म्हणजे, यावेळी ऑरेंज कॅप मिळवण्याच्या शर्यतीत काट्याची टक्क पाहायला मिळत आहे. या पुरस्कारासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि राजस्थान रॉयल्स संघाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयसवाल यांच्यात टक्कर पाहायला मिळत आहे. या दोघांनीही हंगामात एकापेक्षा एक उच्च दर्जाची खेळी साकारली आहे.

यशस्वी आणि फाफमध्ये टक्कर
या हंगामात आरसीबी संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने 11 सामने खेळताना 576 धावा करत ऑरेंज कॅप (Orange Cap) आपल्याकडे ठेवली आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी राजस्थानचा यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) आहे. त्याने 12 सामन्यात 575 धावा केल्या आहेत. म्हणजेच, दोघांच्या धावसंख्येत फक्त एकाच धावेचे अंतर आहे.

याव्यतिरिक्त ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शुबमन गिल, डेवॉन कॉनवे आणि विराट कोहली यांचाही समावेश आहे. गिलने 11 सामन्यात 469 धावा केल्या आहेत, कॉनवेने 12 सामन्यात 468 धावा केल्या आहेत. या दोघांमध्येही 1 धावेचे अंतर आहे. तसेच, विराट कोहली याने 11 सामन्यात 420 धावा केल्या आहेत.

ऑरेंज कॅपच्या यादीतील अव्वल 5 फलंदाज
576 धावा- फाफ डू प्लेसिस (सामने- 11)
575 धावा- यशस्वी जयसवाल, (सामने-12)
469 धावा- शुबमन गिल, (सामने- 11)
468 धावा- डेवॉन कॉनवे, (सामने- 11)
420 धावा- विराट कोहली, (सामने- 11)

ऑरेंज कॅप कुणाला दिली जाते?
ऑरेंज कॅप आयपीएल स्पर्धेत दिला जाणारा एक पुरस्कार आहे. हा पुरस्कार त्या खेळाडूला मिळतो, ज्याने संपूर्ण हंगामात सर्वाधिक धावा केलेल्या असतात. सर्वात पहिला ऑरेंज कॅप पुरस्कार शॉन मार्श याला मिळाला होता. त्याने 2008मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून वादळी फलंदाजी केली होती.

मागील हंगामात ऑरेंज कॅप कुणाच्या नावावर
मागील हंगामात राजस्थान रॉयल्स संघाचा स्टार फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) याने ऑरेंज कॅप पटकावली होती. त्याने 17 सामन्यात 149.05च्या स्ट्राईक रेटने 863 धावा केल्या होत्या. त्यात 4 शतकांचा आणि 4 अर्धशतकांचा समावेश होता. यावेळीही बटलरने चांगली फलंदाजी केली, तर तो ऑरेंज कॅप पटकावू शकतो. (ipl 2023 orange cap after 56 matches yashasvi jaiswal still on this number)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी स्वतःहून कधीच…’, विराटसोबतच्या वादानंतर नवीन उल हकची पहिलीच मुलाखत
जोस बटलरवर बीसीसीआयची मोठी कारवाई! ‘त्या’ कृत्यासाठी बसला ‘एवढा’ मोठा दंड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---