गुरुवारी (18 मे) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर ‘करो या मरो’ सामन्यासाठी समोरासमोर आले. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना रंगला. बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबाद संघ आधीच चालू आयपीएलच्या प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडला आहे. पण आरसीबीसाठी विजय महत्वाचा आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन प्रमुख बदल पाहायला मिळाले. आयपीएल 2023 मध्ये एक शतक सोडता इतर सामन्यांमध्ये हॅरी ब्रुकची बॅट शांत पाहायला मिळाली. पण तरीही हंगामातील आपल्या 13व्या सामन्यात हैदराबादच्या संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला खेळण्याची संधी दिली. त्याचसोबत कार्तिक त्यागी याचेही हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुरनगामन झाले.
आरसीबीने चालू आपीएल हंगामातील 12 पैकी 6 सामने जिंकले आहेत. गुणालिकेत त्यांचा संघ 12 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. अशात प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी लीग स्टेजमधील 13 आणि 14वा सामना आरसीबीला जिंकणे गरजेचे आहे. दुसरीकडे हैदराबाद संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. हैदराबादने लीगमधील पहिल्या 12 पैकी फक्त 4 सामने जिंकले आहेत. 8 गुणांसह हैदराबाद संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरूर, अनुज रावत (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, मायकल ब्रेसवेल, वेन पारनेल, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज.
(IPL 2023 RCB won the toss and elected to bowl first against SRH.)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लैंगिक शोषणाचे आरोप, टी-20 विश्वचषकादरम्यान अटक; श्रीलंकन क्रिकेटपटूबाबत कोर्टाने दिला निकाल
मुंबईचा विजयरथ रोखणाऱ्या मोहसीनचा फॅन बनला स्टॉयनिस, खास शब्दांत गायले गोडवे