इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा नववा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात गुरुवारी (दि. 6 एप्रिल) खेळला जाणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवरील या सामन्याला 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी उभय संघात नाणेफेक पार पडला. ही नाणेफेक जिंकत बेंगलोर संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात कोलकाताला नमवत बेंगलोर संघ सलग दुसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल, तर कोलकाता संघही विजयाचं खातं खोलण्याचा प्रयत्न करेल.
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघात एक बदल झाला आहे. अनुकूल रॉय याला संघातून बाहेर काढले असून त्याच्या जागी सुयश शर्मा (Suyash Sharma) याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून घेतले आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघातही एक बदल आहे. रीस टोप्ले दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याच्या जागी डेविड विली कोलकाताविरुद्ध खेळणार आहे.
https://twitter.com/IPL/status/1643971133807669251
https://twitter.com/KKRiders/status/1643970223211683845
आयपीएल 2023मधील उभय संघांची कामगिरी
बेंगलोर संघाने आयपीएल 2023 स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाविरुद्ध खेळला होता. या सामन्यात बेंगलोरने मुंबईला 8 विकेट्सने पराभूत करत विजयी सुरुवात केली. दुसरीकडे, नितीश राणा या नवीन कर्णधारासोबत स्पर्धेत उतरलेल्या कोलकाता संघाचा पहिला सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाविरुद्ध पार पडला. या सामन्यात पंजाबकडून कोलकाताला 7 धावांनी धोबीपछाड मिळाला. त्यामुळे कोलकाताला विजयी सुरुवात करण्यात अपयश आले. (Royal Challengers Bangalore have won the toss and have opted to field against kkr ipl 2023)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
कोलकाता नाईट रायडर्स
मनदीप सिंग, रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, सुनील नारायण, टीम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मायकल ब्रेसवेल, शाहबाज अहमद, डेलिड विली, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटचा विक्रम मोडणार ऋतुराज गायकवाड? आयपीएलवर एकहाती सत्ता मिळवण्याची संधी
डिविलियर्सने पुन्हा दुखावली RCBच्या चाहत्यांची मने! म्हणाला, ‘हा’ संघच बनणार IPL 2023चा चॅम्पियन






