राजस्थान रॉयल्स संघाला घरच्या सवाई मानसिंग स्टेडिअम, जयपूर मैदानावर दारुण पराभवाचा सामना करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने हा सामना 112 धावांनी खिशात घातला. आयपीएल 2023च्या 60व्या सामन्यात संजू सॅमसन याच्या नेतृत्वातील राजस्थान संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही. संघाचा डाव अवघ्या 59 धावांवर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. या पराभवानंतर संजू सॅमसनने प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाला संजू?
संजू सॅमसन (Sanju Samson) याने पराभवानंतर मोठे भाष्य केले. तो म्हणाला की, “मला वाटते, आमचे 3 अव्वल खेळाडू खूप धावा करत होते. आम्ही पॉवरप्लेमध्ये खूप मेहनत करतो, पण आज हे होऊ शकले नाही. तुम्हाला पॉवरप्लेमध्ये कठोर मेहनत करण्याची गरज आहे. कारण, चेंडू मंद आणि जुना होत होता. अशाप्रकारे मी, जयसवाल आणि जोस खेळलो आहे. आरसीबीच्या गोलंदाजांना त्यांची ऊर्जा आणि तीव्रतेसाठी श्रेय.”
‘कुठे चुकलो याचे उत्तर नाही’
“मला वाटते की, हे अक असे आव्हान होते, जे खराब होऊ शकत होते. आमच्याकडे चांगला पॉवरप्ले असता, तर मला एक चांगल्या सामन्याची आशा होती. मी फक्त विकेट्स पडताना पाहून असा विचार करत होतो की, आम्ही कुठे चूक केली? मला वाटत नाही की, माझ्याकडे अद्याप याचे काही उत्तर आहे,” असेही तो पुढे बोलताना म्हणाला.
‘संपूर्ण संघाला घ्यावी लागेल जबाबदारी’
या हंगामात पुढील प्रवासाबद्दल बोलताना संजू म्हणाला की, “आपल्या सर्वांना आयपीएलबद्दल माहिती आहे, आम्ही साखळी फेरीतत काही मजेशीर गोष्टी पाहिल्या. आम्हाला मजबूत राहावे लागेल. एक दिवसाची सुटी घ्यावी लागेल आणि धरमशालामधील खेळाबाबत विचार करावा लागेल. मला वाटते की, आम्हाला एक मजबूत नोटवर समाप्त करण्याची गरज आहे. एक संघ म्हणून आम्हाला या प्रदर्शनाची संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल.”
सामन्याचा आढावा
या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्स गमावत 171 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या फलंदाजांनी बेंगलोरच्या गोलंदाजांपुढे गुडघे टेकले. त्यांनी अवघ्या 59 धावांवर सर्व विकेट्स गमावले. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात फिरकीपटूंचा जलवा पाहायला मिळाला. संपूर्ण सामन्यातील 7 विकेट्स या फिरकीपटूंनी घेतल्या होत्या. (ipl 2023 rr captain sanju samson react after royal challengers bangalore won by 112 runs in jaipur)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या–
IPLची एकही ट्रॉफी न जिंकणाऱ्या RCBचा भीमपराक्रम! राजस्थानला हरवत नोंदवला खास विक्रम, चेन्नई मागेच
भारतीय दिग्गजाची संघातून केलेली हाकालपट्टी, ब्लॅकमेल करून साधला फायदा; मैदानावर परतताच ठोकलं द्विशतक